Wednesday , August 19 2026
Breaking News

चिक्कोडी-निपाणी महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

चिक्कोडी : चिक्कोडी-निपाणी राज्य महामार्गावरील चिंचणी टोलनाका परिसरात रविवारी भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत हा अपघात घडला. मृत तरुणांची ओळख चिक्कोडी येथील ओतारी गल्ली परिसरातील सिद्धू कुरळे आणि स्वरूप माळवदे अशी झाली आहे.

हे दोघेही आपले काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. चिंचणी टोलनाका परिसरात पोहोचताच त्यांच्या दुचाकीची समोर चिक्कोडीकडे जात असलेल्या ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक बसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *