
बेळगाव : सार्वजनिक श्री एकदंत युवक मंडळ एस टी एम संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने सामाजिक भान राखत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे नंदन मक्कल धाम आश्रम येथील लहान मुलाच्या हस्ते तसेच श्री. मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या शुभ हस्ते मुहुर्तमेढ करण्यात आली.
यावेळी गजराज सेवेकरी भजनी मंडळ कोनवाल गल्ली येथील युवकाच्या हस्ते मोठ्या भक्तिमय वातावरणात आरती करण्यात आली.यावेळी गल्लीतील नागरिकाच्या वतीने श्री. मुरगेंद्रगौडा पाटील व गजराज सेवेकरी भजनी मंडळ तसेच नंदन मक्कल धाम आश्रम मधील मुलाचे शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुरगेंद्रगौडा पाटील यांनी या मुलांना देणगी स्वरुपात भेट ही दिली.
यावेळी बोलताना मुरगेंद्रगौडा पाटील यांनी मंडळाचे कौतुक करून प्रत्येक मंडळाने या मंडळाचे बोद घेऊन सामाजिक कार्य करावे असे आवाहन केले. यावेळी गल्लीतील नागरिकाच्या हस्ते देखील लहान मुलांना देणगी, व चॉकलेट लाडुचे वितरण करण्यात आले. यावेळी गल्लीतील नागरिक, महिला, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta