पंकज पाटील : शाळा खोलीचा शुभारंभ कोगनोळी : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गट कायमपणे प्रयत्नशील आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी गटारी साफ करणे, पिण्याचे पाणी, रस्ते, विद्युत बल्ब यासह अन्य कामे करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी हालसिद्धनाथ नगर येथील सरकारी प्राथमिक शाळेतील खोली पावसामुळे कोसळली होती. यामुळे येथील विद्यार्थ्यांना धोका निर्माण …
Read More »कर्नाटकात वीज दरवाढीचा झटका
मंत्री म्हणतात वाढ नाही, खर्चाचा ताळमेळ; विरोधकांचा हल्लाबोल बंगळूर : वीज दरात प्रति युनिट पाच पैशांनी वाढ केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत, ग्राहकांना पुन्हा धक्का बसला आहे कारण त्यांना १ जुलैपासून प्रति युनिट जास्त वीज बिल भरावे लागणार आहे. दरम्यान वीजमंत्री सुनीलकुमार यांनी ही वीज दरवाढ नसून खर्चाचा ताळमेळ असल्याचे म्हटले …
Read More »हिरण्यकेशीत मासेमारीला उधाण..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीला पावसाचे नवीन पाणी आल्यामुळे मासेमारीला उधाण आलेले चित्र पहावयास मिळाले. हिरण्यकेशी नदीला आलेले नवीन पाणी पहाण्यासाठी लोकांनी एकीकडे गर्दी केलेली असताना युवकांनी मासेमारी करण्यासाठी गर्दी केलेली दिसली. नदीतील नवीन पाण्यातून गळाला मोठे मासे लागत असल्याच्या चर्चेतून नदी काठावर मासेमारीसाठी युवकांची मोठी गर्दी झालेली …
Read More »संकेश्वर येथील मारुती गल्लीत “झुडपे उगवली” राव…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १७ मधील मारुती गल्लीतील मातीचे ढिगारं हटविण्याचे काम पालिकेने गेल्या तीन महिन्यांपासून केलेले नसल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यात आता झुडपे उगवलेली दिसताहेत. पालिकेचे एक काम बारा महिने थांब सारखा प्रकार चालल्याची तक्रार येथील लोकांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना येथील नागरिक रवि कंबळकर म्हणाले, मारुती …
Read More »श्रीक्षेत्र वल्लभगड येथून पायी दिंडीचे प्रस्थान
संकेश्वर (महंमद मोमीन) : श्रीक्षेत्र वल्लभगड येथून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात भक्तीमय वातावरणात श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचे प्रस्थान झाले. वल्लभगड श्रीराम मंदिर येथे दिंडी चालक हभप हैबती वाघमोडे यांनी विणापूजन करुन दिंडी सोहळ्याला चालना दिली. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली वल्लभगड पायी दिंडी सोहळा …
Read More »बरगाव पंचायतीला टाळे ठोकताच पीडिओंनी दिले कामे करण्याचे आश्वासन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बरगाव पंचायतीकडून नागरिकांची कोणतीच कामे केली जात नव्हती. त्यामुळे बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील नागरिक हैराण झाले होते. त्याचबरोबर बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील के. पी. पाटील प्लॉटमधील नागरिकांना उतारे देण्यास टाळाटाळ होत होती. गेली अनेक वर्षे उतारा मिळण्यासाठी के. पी. पाटील यांनी सतत बरगाव ग्राम पंचायतीला …
Read More »सीमाभागातील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी
निपाणी शिवसेनेचे पत्रक : प्रसंगामध्येही सावरले राज्याला निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण तापत चालले आहे. तरीही सीमाभागातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे पत्रक बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख बाबासाहेब तांबे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकातील माहिती अशी, कांही स्वार्थी मंत्र्यांच्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्रास होत आहे. हिंदहृदय …
Read More »रिक्षा अपघातातील मृताच्या वारसांना 22 लाखाची मदत
निपाणी (वार्ता) : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये येथील रहिवाशी व रिक्षाचालक शैलेश मनोहर पारधे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले होते. त्या कुटुंबाच्या मदतीसाठी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांनी विमा कंपनीकडे दावा केला होता. त्यानुसार विमा कंपनीकडून 15 लाख 5 हजार …
Read More »आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीतर्फे कागल एस.टी. आगारप्रमुखांना निवेदन!
कोगनोळी : आप्पाचीवाडी व हदनाळ कर्नाटक सीमाभागातील दोन्ही गावातील बरेच विद्यार्थी हे कागल येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. परंतु सध्या कागल आगाराकडून आप्पाचीवाडी-म्हाकवेमार्गे हदनाळ या गावाला ठराविक बसफेऱ्या सोडून विद्यार्थांच्या सकाळच्या कॉलेजच्या वेळेत व दुपारी परत गावाकडे येण्याच्या वेळेत एसटी बससेवा नसल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोय होत आहे. ही …
Read More »शिरोली मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी महादेव राऊत
खानापूर (प्रतिनिधी) : शिरोली (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलाच्या शाळेच्या एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्षपदी महादेव राऊत यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रेमी व भाजप नेते श्रीपाद शिवोलकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाला एसडीएमसी उपाध्यक्ष प्रिया पवार, सदस्य दत्तात्रय राऊत, अमृत गुरव, दिपक देसाई, धाकलू पाटील, धनापा नंदगडकर, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta