Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

“भावांकुर” काव्यसंग्रहाचे गर्लगुंजीत थाटात प्रकाशन

खानापूर : गर्लगुंजी येथील कवी यल्लाप्पा रामचंद्र पालकर यांच्या पहिल्या भावांकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी गावातील श्री कृष्ण मंदिर बाल विकास केंद्रामध्ये शुक्रवार दि. 13 मे रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गर्लगुंजी ग्रामस्थ, एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव यांच्या …

Read More »

भाजपच्या कोअर कमिटीची उद्या बैठक

बंगळुरू : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बंगळुरू येथे उद्या होणार असून या बैठकीत राज्यातील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांबाबत चर्चा करून काही निर्णय घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्याशी काल …

Read More »

शिवठाणात रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शिवठाणात रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पुजारी रामू मिराशी होते. यावेळी रवळनाथ मंदिराचा कळसारोहण कुंभार्डा येथील हंडीभडगंनाथ मठाचे मठाधिश श्री पिरयोगी मोहननाथजी यांच्याहस्ते करण्यात आला. तर रवळनाथ मंदिराचा लोकार्पण श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजपनेते विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात …

Read More »

ज्येष्ठ कवी यल्लाप्पा पालकर यांच्या भावांकुर कवितासंग्रह उद्या प्रकाशन

  बेळगांव : भावांकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी येथील कवी यल्लाप्पा रामचंद्र पालकर यांच्या पहिल्या भावाकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी गावातील श्री कृष्ण मंदिर बाल विकास केंद्रामध्ये शुक्रवार दि. 13 मे रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थित उपस्थित होणार आहे. एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य …

Read More »

पादगुडी श्री बसवेश्वर यात्रा महोत्सव

संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील पादगुडी श्री बसवेश्वर देवस्थानची यात्रा उत्साही आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे येथील यात्रा होऊ शकलेली नव्हती. यंदा मात्र यात्रोत्सव साजरी करण्यात आली. पादगुडी श्री बसवेश्वर देवस्थान पुरातन कालीन असून येथे विजयादशमीला सोने लुटणेचा कार्यक्रम परंपरागत पध्दतीने पार पडला जातो दसरा असो …

Read More »

संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावर सांडपाणी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. इकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचे गणेश परीट यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे वाहनधारकांची पंचाईत होतांना दिसत आहे. येथील कारेकाजी पेट्रोल पंप नजिकच्या संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. त्यातूनच दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची ये-जा चालू असते त्यामुळे …

Read More »

प्रभाग 13 चा समझोता फिसकटला; दुरंगी सामना होणार..

संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभाग क्रमांक 13 करिता भाजपाने समझोतासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण काँग्रेसने चाणाक्षपणाने प्रस्ताव फेटाळून निवडणुकीला सामोरे जाणेच इष्ट समजल्याने प्रभाग 13 ची दुरंगी लढत होत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वी समझोत्याचे प्रयत्न झाले. हुक्केरीचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी …

Read More »

दुर्गम भागातील गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील

युवा नेते उत्तम पाटील : शिरगुप्पीत विविध कामांचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : बरीच वर्षे राजकारणातील विविध पदे भुषवूनही अजूनही दुर्गम भागातील पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा भागातील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही वास्तू स्थिती असताना लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण आपल्याकडे …

Read More »

शहरातील मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा

श्रीराम सेना हिंदुस्तान संघटना : शहर पोलिसांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरात असलेल्या मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने येथील शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांना देण्यात आले. परिसरातील अनेक मशीदवर बेकायदेशीर भोंगे आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी …

Read More »

कार – दुचाकी अपघातात दोघे जण जखमी

निपाणी (वार्ता) : येथील अकोळ क्रॉस छत्रपती शिवाजी सांस्कृतिक भवनासमोर भरधाव दुचाकीने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.११) घडली. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात उदय पाटील (वय १८), सौरभ पाटील (वय २३) दोघेही रा. म्हसोबा हिटणी ता. …

Read More »