Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

बेळगावमध्ये ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे आयोजन

बेळगाव (वार्ता) : बेळगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध दलित संघटनांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी भीमा कोरेगाव लढ्याच्या …

Read More »

अपघातात जुने बेळगावचा युवक ठार

बेळगाव : दुचाकी दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बी. एस. येडीयुरप्पा रोडवर घडली आहे. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान जुने बेळगाव नाक्याजवळ ओल्ड पी. बी. रोडवर हा अपघात झाला आहे. ओमकार लक्ष्मण गडकरी (वय 19) रा. लक्ष्मी गल्ली जुने बेळगाव असे …

Read More »

नूतन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

बेळगाव : बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची तडकाफडकी बेंगलोरला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस आयुक्त म्हणून डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची नेमणूक करण्यात आली आहे. नूतन पोलीस आयुक्त म्हणून आज शनिवारी सायंकाळी डॉ. बोरलिंगय्या यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे स्वीकारली. नव्या पोलीस आयुक्तांवर सर्वात मोठी जबाबदारी …

Read More »

‘अंकुर’तर्फे गतिमंद मुलांसाठी 24 ते 26 विविध स्पर्धा

बेळगाव : शहरातील अंकुर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन या शाळेतर्फे सावित्रीबाई फुले समितीच्या सहयोगाने येत्या 24 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये गतिमंद मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले उद्यान, गुरुवार पेठ (मिलेनियम गार्डन समोर), टिळकवाडी येथे या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. गतिमंद मुलांसाठी (स्पेशल चाईल्ड) नृत्य …

Read More »

क्रीडाशिक्षक विवेक पाटील यांचा सत्कार

बेळगांव : टिळकवाडी शाळेचे क्रीडा शिक्षक विवेकानंद वैजनाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संतमीरा शाळेच्या माधव सभागृहात नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धेत दरम्यान खासदार मंगला अंगडी संतमीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, माधुरी जाधव, आनंद सोमनाचे, राजेश लोहार, संतमीरा शाळेचे प्रशासन राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव या …

Read More »

करदात्यांसाठी बेळगावात सेवा केंद्राचे उद्घाटन

बेळगाव: ऑनलाईन प्रणालीद्वारे करदात्यांना अर्ज करताना किंवा रिटर्न फाईल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या समस्यांचे निवारण करण्यासाठी करदात्यांसाठी शहरातील जीएसटी व्यावसायिक कर कार्यालयांमध्ये सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन काल गुरुवारी झाले. क्लब रोड येथील व्यवसायिक कर कार्यालयांमध्ये करदात्यांसाठी सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली असून या …

Read More »

वेटलिफ्टिंगमध्ये अक्षता कामतीला सुवर्णपदक

बेळगाव (वार्ता) : हालगा बेळगावची सुकन्या होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिची वेटलिफ्टिंगमधील विजयी घोडदौड सुरूच असून गुंटूर (तेलंगणा) येथे काल गुरुवारी पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक हस्तगत केले आहे. गुंटूर (तेलंगणा) येथे काल पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमधील …

Read More »

‘त्या’ 38 युवकांवर आता राज्यद्रोहाचा गुन्हा

बेळगाव (वार्ता) : बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर शहरातील धर्मवीर संभाजी चौकात निषेध नोंदविणार्‍या आणि सध्या अटकेत असलेल्या 38 मराठी भाषिक युवकांवर अन्य गुन्ह्यांत बरोबरच आता भा.द.वि. कलम 124 अ अन्वये राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेंगलोर येथील शिवरायांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ ध. संभाजी चौकात लोकशाही …

Read More »

बेळगावात राष्ट्रकवी कुवेम्पू जन्मदिनाचे आचरण

बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरात आज राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या जन्मदिनाचे आचरण करण्यात आले होतेबेळगावच्या बसवराज कट्टीमनी सभागृहात जिल्हाप्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका तसेच कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येणार विश्वमानव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय …

Read More »

काकतकर महाविद्यालयात 64 विद्यार्थ्यांचे रक्तदान

बेळगाव (वार्ता) : रोटरी क्लब बेळगाव दक्षिण आणि रेडक्रॉस सोसायटी बेळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात आज स्वयंप्रेरित रक्तदान शिबीर घेण्यात आले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयात रोटरी क्लब बेळगाव दक्षिण आणि रेडक्रॉस सोसायटी बेळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, …

Read More »