Tuesday , November 24 2026
Breaking News

बेळगाव

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप तर दोघांना २० वर्षांची सक्तमजुरीची

  बेळगाव : बेळगावमधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात बेळगाव विशेष जलदगती जिल्हा पॉक्सो न्यायालयाने शनिवारी चार आरोपींना दोषी ठरवत दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर दोघांना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. १० मे २०२५ रोजी अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून, मैत्री करून, अपहरण करून सावगाव येथील एका फार्महाऊसवर नेण्यात आले, जिथे …

Read More »

मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव

  बेळगाव : दिनांक 23/01/2026 व 24/01/2026 या दोन दिवशी मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड विषयाचे शिक्षक सुरेश कुंदेकर तर दुसऱ्या दिवशी क्रीडा शिक्षक श्रीधर बेन्नाळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा …

Read More »

कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा जोशपूर्ण सांगता समारंभ उद्या हिंडलगा येथे होणार

  मण्णूर : शिक्षण हेच परिवर्तनाचे खरे साधन आहे, या उदात्त विचारातून गेले सहा ते सात रविवार सातत्याने राबविण्यात आलेली आणि बेळगाव तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रतिष्ठा मिळवून दिलेली कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमाला उद्या हिंडलगा हायस्कूल, हिंडलगा येथे सांगता समारंभाने पूर्णत्वास जाणार आहे. या व्याख्यानमालेत विविध विषयांतील तज्ज्ञ …

Read More »

समाज सारथी सेवा संघाच्या अध्यक्षपदी प्रा. सी. एम. गोरल तर सेक्रेटरी पदी बी. एन. मजुकर

  इतरही पदाधिकाऱ्यांची निवड येळ्ळूर : नेताजी भवन येळ्ळूर येथे समाज सारथी सेवा संघाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बळीराम देसूरकर होते. संघाच्या ध्येय धोरणाची चर्चा झाल्यानेतर सर्वानुमते 11 सदस्यांची कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. अध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी बी. एन. मजुकर, उपसेक्रेटरी डॉ. तानाजी …

Read More »

‘कवितेचे पान’ चॅनलवरील हर्षदा सुंठणकर यांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

  बेळगाव : ‘आई कुठे काय करते’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्या ‘कवितेचे पान’ या यूट्यूब चॅनलवर नुकतीच हर्षदा सुंठणकर यांची मुलाखत व कविता वाचनाचा विशेष एपिसोड प्रसारित झाला असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. हर्षदा सुंठणकर यांच्या गाजलेल्या ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या कवितासंग्रहाचा हिंदी …

Read More »

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मराठा मंडळ फार्मासी कॉलेजच्या एनएसएसतर्फे अनाथालयास भेट

  बेळगाव : राष्ट्रीय बालिका दिनाचं औचित्य साधून २४ जानेवारी रोजी, मराठा मंडळ फार्मासी काँलेजच्या एनएसएस युनिटच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एनएसएस युनिट व प्रथम वर्ष डी. फार्मा विद्यार्थ्यांनी सुभाषनगर, बेळगाव येथील गंगाम्मा चिक्कुंबी मठ या अनाथालयास भेट दिली. हा कार्यक्रम सहाय्यक प्राध्यापिका तसेच कार्यक्रम प्रमुख प्रा. …

Read More »

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे : किरण जाधव

  बेळगाव : तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य दिन अशी सिंहगर्जना करणाऱ्या भारत मातेचे थोर सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विद्यार्थ्यांनी विचार आचरणात आणावे आणि आणले पाहिजे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात राष्ट्रप्रेम राहणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या अज्ञानुसार शिक्षण घेत जीवनात यशस्वी ही होणे काळाची गरज आहे, असे उद्गगार …

Read More »

हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचा प्रारंभ

  बेळगाव : “हरे कृष्णा, हरे कृष्णा ,कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज संपूर्ण बेळगावला कृष्णमय केले. दुपारी ठीक 1 वाजून 31 मिनिटांनी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली ही रथयात्रा म्हणजे संपूर्ण बेळगावचा एक आनंदाचा उत्सवच होता. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दरवर्षी …

Read More »

विज्ञानाचा आविष्कार अन् कलेचा जागर : ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये प्रदर्शन संपन्न!

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘स्पेक्ट्रम’ व ‘आकार’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. किरण यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे प्रो. एम. बी. निर्मळकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, प्राचार्या सौ. …

Read More »

उचगांव ब्लॉक युवा काँग्रेस अध्यक्ष व्यंकट पाटील यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थांच्या पादुकांचे मंगलमय आगमन

  देसूर : येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले उचगांव ब्लॉक युवा काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट पाटील यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले. या मंगल प्रसंगी पाटील कुटुंबियांच्या वतीने पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी ‘श्री स्वामी समर्थ’ नामाच्या जयघोषाने परिसर …

Read More »