Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

गणपत गल्ली परिसरातील अतिक्रमण हटवले

  बेळगाव : बेळगावातील गणपत गल्ली परिसरातील अतिक्रमण हटविल्याने अखेर या बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला आहे. बेळगाव महानगरपालिका आणि वाहतूक विभाग पोलिसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या कारवाईत फेरीवाल्यांना हटवण्यात आले असून, त्यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गणपत गल्लीसह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फेरीवाले आणि बैठे विक्रेते रस्त्यावरच ठिय्या देऊन …

Read More »

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावात ख्रिश्चन समाजाची मूक मिरवणूक

  बेळगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावात ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राइट्स – बेळगाव विभाग आणि बेळगाव पॅस्टर्स अँड ख्रिश्चन लीडर्स असोसिएशन यांच्या वतीने या शांततेच्या आणि ऐक्याच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ही मूक मिरवणूक सेंट्रल मेथोडिस्ट चर्च येथून सुरू होऊन …

Read More »

दोन कारमध्ये समोरासमोर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावाजवळ सोमवारी दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. बैलहोंगल ते बेळगाव जोडणाऱ्या महामार्गावर अपघात झाला.  बेळगावहून बैलहोंगलकडे जाणारी किआ कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या अल्टो कारला ओव्हरटेक करताना धडकली. अल्टो कारमधील पती आयुम, त्याची पत्नी आणि एका …

Read More »

गीत कर्णायनचे पवन खेबुडकर यांच्या हस्ते प्रकाशन

  सदलगा : सदलग्यातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व कै. महादेव दामोदर जोशी यांच्या तब्बल ५५ ते ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या हस्तलिखित गीत कर्णायन या महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित गीत संग्रहाचे प्रकाशन आज शेंडा पार्क मधील चेतना विकास मंदिराच्या सभागृहात चेतना अपंगमती विकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग. दि. …

Read More »

“पंच हमी” योजनांवर आधारित पुस्तिकेचे पालकमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन

  बेळगाव : राज्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी, राज्य सरकारच्या सार्वजनिक उपयोगिता विभाग आणि जिल्हा प्रशासनाने “पाच हमी” योजनांवर आधारित एक पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. माहिती आणि जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेल्या पाच हमींबाबत आज सोमवारी (५ मे) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना …

Read More »

लक्ष्मीनगर हिंडलगा येथे चित्ररथ मिरवणूक उत्साहात

  बेळगाव : सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळ यांच्या वतीने पारंपारिकरित्या शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा देखावा सादर करण्यात आला. यावेळी महिला व बाळगोपाळांचा मोठा सहभाग होता. झांजपथकाने वेगळ्या प्रकारे झांज वाजवून नृत्य सादर केले. यावेळी मंडळ कार्यकर्ते विनोद हंगिरगेकर, सुधीर सुतार, सागर बडमंजी, पुंडलिक …

Read More »

श्री देव दादा सासनकाठी श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडीकडे प्रस्थान

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडी येथे श्री देव दादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्यावतीने पूजा व अभिषेकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवार दिनांक 4.05.2025 रोजी दुपारी 4 वाजता चव्हाट गल्ली देवघर येथून बैलगाडी व भाविक देवरवाडी देवस्थानला प्रस्थान झाले. सोमवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी  वाजता अभिषेक …

Read More »

प्रवण प्रजापती राजहंसगडाचा राजा तर प्रतीक्षा कुरबर राजहंसगडाची राणी

  मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने राजहंसगड चढणे उतरणे स्पर्धा संपन्न बेळगाव : बेळगाव शहरांमध्ये पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी राजहंसगड चढणे उतरणे स्पर्धा भरवण्यात येतात.यावर्षीही या स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रवण प्रजापती यांनी राजहंसगडाचा राजा तर प्रतीक्षा कुरबर हिने …

Read More »

प्राणघातक शस्त्रांनी वार करून तरुणाची निर्घृण हत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात एका तरुणाची रस्त्याच्या मधोमध निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरातील परशुराम गोंधळी (वय २५) नावाच्या तरुणाची घातक शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. गोकाक शहरातील जेआरबीसीकडे जाणाऱ्या गेटजवळ ही घटना घडली. पोलिसांना हाक मारून त्यांना मारल्यानंतर आरोपी पळून गेले. …

Read More »

राजहंसगड चढणे उतरणे स्पर्धा उद्या

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे रविवार दि. 4 रोजी राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7.30 वा. येळ्ळूर गडाच्या पायथ्यापासून या स्पर्धेला प्रारंभ करण्यात येणार आहे. मुला- मुलींच्या दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात येईल. विजेत्यांना रोख रक्कमेसह गंगाराम सेवा ट्रस्टतर्फे आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात …

Read More »