Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराजांच्या पादुकांना उद्या अभिषेक

  बेळगाव : गुरुपौर्णिमानिमित्त पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराजांच्या पादुकांना उद्या बुधवार दि. 13 जुलै रोजी पंचामृत अभिषेक आणि लघुरुद्र अभिषेक घालण्यात येणार आहे. पंत बाळेकुंद्री श्रीदत्त संस्थानच्यावतीने यावेळी तीस हजार पंचामृत अभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सकाळी 7 वा. सकाळची आरती, 8 वा. गुरुपौर्णिमा अभिषेक संकल्प सोडणे, …

Read More »

बेळगाव जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

  280 बुद्धिबळपटूंनी घेतला होता स्पर्धेत भाग : ज्येष्ठ बुद्धिबळपटू गिरीश बाचीकर ठरले टूर्नामेंट चॅम्पियन बेळगाव : नुकत्याच घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ज्येष्ठ बुद्धिबळपटू गिरीश बाचीकर हे टूर्नामेंट चॅम्पियन ठरले. स्पर्धेत साडेआठ पॉईंट घेऊन पहिला क्रमांक पटकावलेल्या गिरीश बाचीकर यांना 5001 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात …

Read More »

इनरव्हील क्लबकडून शालेय विद्यार्थ्यांना चप्पलचे वितरण

बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव यांच्यातर्फे सोमवारी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर सुविधा देखील उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून शालेय विद्यार्थ्यांना चप्पलचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. गुरुप्रसाद नगर मंडळी येथील सरकारी कन्नड शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ …

Read More »

अलमट्टी धरणातून 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

बेळगाव : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून आज (दि.12) सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 75 हजारावरुन 1 लाख क्युसेक करण्यात आला आहे. गेली दोन दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग 75 हजार क्युसेक करण्यात येत होता. या धरणाची क्षमता 123 टीएमसी असून सध्या या धरणात …

Read More »

हर्षद बुवांच्या कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध!

नामदेव देवकी संस्थेतर्फे तीन दिवसीय कीर्तनमाला बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त शहापूर येथील नामदेव दैवकी संस्था आयोजित नामदेव विठ्ठल मंदिरात तीन दिवसीय कीर्तनमाला उत्साहात पार पडली. पुण्याचे प्रसिद्ध कीर्तनकार हभप हर्षदबुवा जोगळेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संवादिनीसाथ श्री. वामन वागुकर यांनी तर पकवाजाची साथसंगत श्री. यशवंत पांडुरंग बोंद्रे यांनी …

Read More »

बिम्समध्ये चोरी करणार्‍याला पकडले

बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात चोरी करणार्‍या चोरट्याला रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात घडली. बेळगाव येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून चोरी करणार्‍या सराईत चोराला रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचार्‍यांचे पैसे आणि …

Read More »

अपघातात बेळगुंदीच्या जवानाचा दुदैवी मृत्यू

बेळगाव : स्विफ्ट कारची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात बेळगुंदी गावच्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. बेळगाव -राकस्कोप रोडवर बाकनूर क्रॉस नजीक असलेल्या नाल्याजवळ ही घटना घडली असून या घटनेमध्ये ओमकार महादेव हिंडलगेकर (वय 23) रा. कलमेश्वर गल्ली बेळगुंदी या जवानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मिळालेली अधिक …

Read More »

‘वन टच’ची वृत्तपत्र विक्रेत्याला मदत

बेळगाव : गोडसे कॉलनी, जुना गुडसशेड रोड येथील ‘वन टच फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून कोरे गल्ली येथील गरजू वृत्तपत्र विक्रेते रमेश सरोदे यांना आर्थिक मदत देण्यात आली. रमेश सरोदे यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून त्यांचा एकुलता एक मुलगा योगेश याला कॅन्सर असून त्याच्या उपचारासाठी दरमहा रू. 8000 ते …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने स्थापना दिवस अपूर्व उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषद बेळगांवच्यावतीने परिषदेचा 60 वा स्थापना दिवस, दहावी व बारावीच्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच डाॅक्टर्स डे निमित्त सेवाभावी डाॅक्टरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी सायंकाळी आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. एस्. एन्. शिगली व डाॅ. सविता कड्डू उपस्थित होते. प्रारंभी विनायक मोरे …

Read More »

डिसेंबरपूर्वी सीबीटीचे कामकाज पूर्ण करा : जिल्हाधिकारी

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेले सीबीटी अर्थात बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम येत्या डिसेंबर पूर्वी वेळेत पूर्ण करावे, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची आज सोमवारी जिल्हाधिकारी पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित …

Read More »