Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

जातीय जनगणना: शेवटचा दिवस आला तरी सर्वेक्षण अपूर्णच; आज मुदतवाढीची घोषणा शक्य

  बंगळूर : राज्यात २२ सप्टेंबरपासून सुरू झालेले सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली अंतिम मुदत उद्या (ता. ७) संपत आहे. अंतिम मुदत जवळ येत असली तरी, सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्वेक्षणाबाबत चिंता वाढत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक …

Read More »

हबनहट्टी येथील वाल्मिकी मंदिराच्या उद्घाटनासाठी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची उपस्थिती

  खानापूर : आज वाल्मिकी जयंती. या जयंतीचे औचित्यसाधून हबनहट्टी येथील वाल्मिकी मंदिराच्या उद्घाटनासाठी खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर या आज सकाळी ११.३० वाजता हबनहट्टी येथे उपस्थित रहाणार असून डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्याहस्ते मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. डॉ. निंबाळकर या आमदार असताना या मंदिरासाठी …

Read More »

नंदगड येथील अंगणवाडी कार्यकर्तीच्या खून प्रकरणी टेम्पो चालकाला अटक

रामनगर : नंदगड (ता. खानापूर) येथील अंगणवाडी कार्यकर्ती अश्विनी बाबुराव पाटील (वय 50, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, या प्रकरणात टेम्पो चालक शंकर पाटील (वय 35) याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी शंकर पाटील याने आपल्या टेम्पोमधून अश्विनी पाटील यांना …

Read More »

श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, तोपिनकट्टीत खो-खो, कबड्डी स्पर्धा 18 व‌ 19 ऑक्टोबर रोजी

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 व दिनांक 19 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो -खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस …

Read More »

राज्यातही कफ सिरपवर लक्ष ठेवण्याचे निर्देश

  मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यूमुळे खबरदारी बंगळूर : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भेसळयुक्त खोकल्याच्या औषधामुळे ११ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, कर्नाटकमध्येही राज्य सरकारने कडक कारवाई केली आहे. राज्यात कोल्ड्रिफ सिरपचा पुरवठा होत नसला तरी, आरोग्य विभागाने या सिरपवर लक्ष ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना राज्यातील कफ सिरपवरही …

Read More »

नवजात बाळाच्या पोटात आढळला गर्भ; हुबळीतील किम्समध्ये आश्चर्यकारक घटना

  बंगळूर : हुबळीचे किम्स रुग्णालय एका दुर्मिळ घटनेचे साक्षीदार झाले आहे. इथे एका नवजात बाळाच्या गर्भाशयात आणखी एक गर्भ आढळला. दुसऱ्यांदा गरोदर राहण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेच्या बाळाच्या गर्भाशयात दुसरा गर्भ असल्याचे आढळून आले. धारवाड जिल्ह्यातील कुंडगोल तालुक्यातील एका गर्भवती महिलेला दुसऱ्या प्रसूतीसाठी केआयएमएसच्या माता आणि बाल विभागात …

Read More »

चव्हाणवाड्यात खारीक, उदीचा प्रसाद

  निपाणी उरूस : फकिरांसह मानकऱ्यांकडून अर्पण गलेफ निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे दर्गाहचे संस्थापक संत बाबा महाराज चव्हाण यांच्या चव्हाण वारसातर्फे मानाचे निशाण व गलेफ संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, नवलिहाळकर सरकार, …

Read More »

नारी शक्ती ही देशाच्या आत्मा आहे : प. पू. प्राणलिंग स्वामीजी

  विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग निपाणी : श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथेविश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग शनिवारी सायंकाळी सुरू झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प.पू. प्राणलिंग स्वामीजी तसेच मातृशक्तीच्या उपाध्यक्ष सुचिता ताई कुलकर्णी व दुर्गा वहिनीच्या प्रमुख श्वेता ताई हिरेमठ यांच्या हस्ते भारत …

Read More »

नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिकेची आत्महत्या की हत्या?

खानापूर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिनेघाट-पालडा रस्ता क्रॉस जवळील पुलाखालील पाण्यात तरंगताना एका महिलेचा मृतदेह शनिवारी (रात्री) सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख अश्विनी बाबुराव पाटील (वय ५०, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) अशी पटली आहे. त्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पाटील या …

Read More »

कर्नाटकमध्ये देशात सर्वाधिक वैद्यकीय जागा

  बंगळूर : चालू शैक्षणिक वर्षात, देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्ये सर्वाधिक वैद्यकीय जागा मिळाल्या आहेत. यावर्षी राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी १,२०० जागा वाढल्या आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी दोन्ही महाविद्यालयांचा समावेश आहे ज्यात एकूण १३,५९५ जागा आहेत, तर २०२४-२५ शैक्षणिक वर्षात १२,३९५ जागा मिळाल्या होत्या. या वर्षी, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने …

Read More »