राष्ट्रीय स्तरावर निवड; सौंदलग्याच्या शिरपेचात मानाचा तुरा सौंदलगा : सौंदलगा येथील ऋषिकेश सागर यादव यास लहानपणापासूनच व्हॉलीबॉल खेळाची आवड होती. ही आवड लक्षात घेऊन त्याचे वडील सागर वसंत यादव यांनी या खेळांमध्ये करियर करण्यास संधी दिली. त्याचे ऋषिकेश याने सोने केले. ऋषीकेश यादव यांचे प्राथमिक शिक्षण सौंदलगा येथील मराठी शाळेत …
Read More »हलशी येथे अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त 21 रोजी मॅरेथॉन स्पर्धा
बेळगाव : हलशी येथील सरकारी मराठी शाळेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त गुरुवार (ता. 21) रोजी अमृतमहोत्सव रण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चार गटात होणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी शाळेचा अमृत महोत्सव कार्यक्रम रविवारी (ता. 24) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी भरगच्च …
Read More »मांगुर फाट्याजवळ आयशर ट्रक पलटी
सौंदलगा : सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या मांगुर फाट्याजवळ आयशर ट्रक शेतात पलटी होऊन पडल्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी कोणतीही जिवितहानी झाली नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रात्री ८ च्या सुमारास गुजरात वरून बेळगावकडे निघालेला आयशर ट्रक एमएच.१० सीआर ८७४८ हा ट्रक रोहित बागडे (रा.इचलकरंजी) …
Read More »सौंदलगा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस
सौंदलगा : सौंदलगा येथे शुक्रवारी रात्री ७ च्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने सौंदलगा गावातील अनेक घरांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी घरांचे पत्रे, जनावरांच्या साठी बांधलेली शेड, घराची कवले उडून गेली आहेत तर कुंभार गल्लीमधील दुसरा मजला बांधकामासाठी उभी करण्यात आलेली मोठी भिंत शेजारच्या घरावर कोसळून लाखो …
Read More »शेतकऱ्याने संघटितपणे जागृत राहण्याची गरज
राजू पोवार : हादनाळ येथे रयतच्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. शिवाय खते, बी बियाणे, औषधानीही महागाईचा कळस गाठला आहे. पण शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या लोकांना मात्र हमीभाव मिळत नसल्याने तो दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावरील होणाऱ्या …
Read More »संकेश्वरात मटण झाले स्वस्त….
संकेश्वर (प्रतिनिधी) : आजच्या महागाईच्या जमान्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी होण्याची शक्यता कोठेच दिसेनासी झालेली असताना संकेश्वरातील मटण विक्रेत्यांनी प्रतिकिलो मटणचा दर शंभर रुपयांनी कमी करुन मासांहारी लोकांना दिलासा मिळवून देण्याचे कार्य केलेले दिसताहे. येत्या मंगळवार दि. 12 एप्रिल 2022 पासून संकेश्वरात मटण प्रतिकिलोचा दर 500 रुपये राहणार आहे. त्यामुळे …
Read More »संकेश्वर काँग्रेसतर्फे गुहमंत्र्यांचे उच्चाटन करण्याचे निवेदन
सी. टी. रवि यांना अटक करण्याची मागणी संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी यांच्या नेतृत्वाखाली आज पोलिस ठाण्यावर मोर्चाने जाऊन पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांना राज्याचे गृहमंत्री आणि सी. टी. रवि यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातून राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांना मंत्रीपदावरुन उच्चाटन आणि …
Read More »तोपिनकट्टीत महाप्रसादाने गणेश मुर्तीचा वर्धापनदिन सोहळा साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टीत (ता. खानापूर) येथे गेल्या दोन दिवसापासुन श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा २० वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी श्री गणेश मूर्तीला अप्पाजी हलगेकर यांच्या हस्ते अभिषेक घालुन सोहळ्याला उत्साहात सुरूवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव गुरव उपस्थित होते. तर दीपप्रज्वलन मल्लेशी खांबले, विठ्ठलराव करंबळकर, मारूती गुरव …
Read More »सिंगीनकोप शाळेत समुदाय दत्त कार्यक्रम उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील मराठी मुलाच्या शाळेत समुदाय दत्त कार्यक्रम शनिवारी दि. ९ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते. तर नोडल अधिकारी म्हणून गणेबैल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक पी. टी. चोपडे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी तालुका सदस्या कविता …
Read More »दुकान बंद करून जाणाऱ्या सराफाला भररस्त्यात लुटले
११ लाखाचा ऐवज लंपास : लुटारू उसाच्या फडात गायब निपाणी (विनायक पाटील) : जत्राट- जैनवाडी मार्गावर जैनवाडीपासून जवळ एका सराफाला दुकान बंद करून जाताना लुटारूंनी पाठलाग करून लुटल्याची घटना शुक्रवारी (ता.८) सायंकाळच्या सुमारास घडली. धोंडीराम कुसाळे (रा. मांगुर) असे लूट झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडून सोन्याचे साडेबारा तोळ्याचे दागिने व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta