Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

चापगांव परिसरातील शेतवडीत वीज कोसळून 11 बकरी मृत्युमुखी…

  खानापूर : खानापूर तालुक्यात आज सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. याचदरम्यान चापगांव येथील शेतवडीत सोमवार दिनांक 12 रोजी सायंकाळी वीज कोसळल्याने एका धनगराची 11 बकरी मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर धनगराचे नाव उमेश यल्लाप्पा चिचडी, राहणार होण्णनूर तालुका बैलहोंगल असे आहे. चापगांव येथील मानीतील तलाव …

Read More »

खानापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

  खानापूर : खानापूर तालुका परिसरात आज दुपारच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे, खानपूर-नंदगड रस्त्यावर करंबळ गावाजवळ एक मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक एक तासाहून अधिक काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने, या घटनेच्या वेळी झाडाखाली कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. …

Read More »

फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू

  जोयडा : फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना जोयडा तालुक्यातील चापोली या ठिकाणी घडली आहे. सदर अस्वल 14 ते 15 वर्षाचे असून मादी जातीचे आहे. जोयडा तालुक्यातील चापोली घाटामध्ये रस्त्यावर असलेल्या फणसाच्या झाडावर चढून फणस खात असताना झाडाच्या बाजूने गेलेल्या 11 के व्ही च्या …

Read More »

गर्लगुंजी येथील वेंटेड डॅमचे काम त्वरित करा : सहाय्यक कृषी निर्देशकांना निवेदन

खानापूर : गर्लगुंजी येथील बिर्जे शेत सरकारी नाल्यावर वेंटेड डॅमचे काम त्वरित पूर्ण करा, अशा आशयाचे निवेदन ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक कृषी निर्देशक सतीश माविनकोप यांना देण्यात आले. गावातील 70 ते 80 एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न सुटणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत हे …

Read More »

मनगुती येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

  दड्डी : मनगुती ता. हुक्केरी येथील प्राथमिक मराठी शाळा मनगुती व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालय मनगुती येथे ई. 2001-2002.. मध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. तब्बल 25 वर्षांनी या कार्यक्रमाचे नियोजन झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास …

Read More »

प्रसिद्ध शास्त्रज्ञ सुबण्णा अय्यपन यांचा मृतदेह सापडला कावेरी नदीत; आत्महत्त्येचा संशय

    बंगळूर : श्रीरंगपट्टणातील कावेरी नदीत प्रसिद्ध शास्त्रज्ञ सुब्बण्णा अय्यप्पन यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली आहे. प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बण्णा अय्यप्पन यांचा शनिवारी संध्याकाळी मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण तालुक्यातील साई आश्रमाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्बण्णा हे त्यांच्या पत्नीसोबत म्हैसूरमधील विश्वेश्वरय्या नगरमधील एका …

Read More »

ऑपरेशन सिंदूरमधील जवानांच्या समर्थनार्थ बेंगळुरूमध्ये कर्नाटक काँग्रेसची ‘तिरंगा रॅली’

  बेंगळुरू : पहलगाम येथील हल्ल्यानंतर सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातून भारतीय सैनिकांप्रती एकता आणि समर्थन व्यक्त केले जात आहे. कर्नाटक काँग्रेसनेही ‘तिरंगा यात्रा’ काढून या भावनांना वाट मोकळी करून दिली. आज सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूरमधील के.आर. सर्कल येथून या रॅलीला प्रारंभ झाला. ‘देशभक्ती दर्शवूया, एकता …

Read More »

भरधाव कारची थांबलेल्या ट्रकला धडक; 6 जणांचा जागीच मृत्यू

  हावेरी : थांबलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोघे जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूर गावाजवळ आज गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. राणेबेन्नूर येथील सिद्धेश्वर नगर आणि हरिहरसह गोव्यात राहणारे फरान …

Read More »

आंबे काढताना तोल जाऊन झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू

  मेंढेगाळी गावचा रहिवासी भांबार्डी परिसरात घडली दुर्दैवी घटना खानापूर : भांबार्डी (ता. खानापूर) गावाजवळील शेतातील आंबे काढताना तोल जाऊन झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ७ मे) दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृताचे नाव रवळनाथ नारायण गुरव (वय ४५, मूळगाव मेंढेगाळी, ता. खानापूर; सध्या रा. शिवणे, पुणे) …

Read More »

बेळगाव – धारवाड थेट रेल्वे मार्गासंदर्भात गर्लगुंजी परिसरातील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

  खानापूर : केआयएडीबीने शेतकऱ्यांना नोटीस पाठविलेल्या होत्या त्यावर शेतकऱ्यांनी केआयएडीबी ऑफिसला जाऊन आपला विरोध नोंदविला होता, नंतर दुसऱ्या वेळी बेळगाव येथे विरोध नोंदविला. अनेकवेळा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विरोध करून वापस पाठविले, मात्र रेल्वे अधिकारी थोडीशी जमीन घेतली जाणार म्हणून सांगत असतानाच आता फक्त बेळगाव जिल्ह्यातून 1200 एकर जमीन अधिग्रहित केली …

Read More »