बेळगाव : श्रावण महिना अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मांसाहाराला मागणी वाढली आहे. येत्या शुक्रवारपासून श्रावण महिना सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी चिकन आणि मटणाच्या मागणीत वाढ झाली आहे. ग्रामीण बरोबरच शहरी भागात देखील सकाळपासून चिकन आणि मटणाच्या दुकानांमध्ये मांसाहार प्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. श्रावणात मांसाहार वर्ज्य …
Read More »युवा समितीच्या वतीने मच्छे व लक्ष्मीनगर मच्छे येथील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी युवा समितीच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते त्यानुसार शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी मच्छे येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी प्राथमिक शाळा मच्छे येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के.के. …
Read More »न्यायालयात आवारातच पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला!
बेळगाव : कौटुंबिक वादामुळे घटस्फोटासाठी एक जोडपे न्यायालयात आले होते, परंतु पतीने न्यायालयात आवारातच पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात घडली. सौंदत्ती तालुक्यातील करिकट्टी गावातील ऐश्वर्या गणाचारी हिच्यावर बैलहोंगल तालुक्यातील सवंतगी गावातील मुथप्पा गणाचारी याने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी महिलेवर सौंदत्ती …
Read More »वडगाव श्री मंगाई देवी यात्रोत्सवाला भक्तिभावाने प्रारंभ…
बेळगाव : नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या बेळगावच्या वडगाव येथील श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला आज भाविकांच्या प्रचंड गर्दीत उत्साहात सुरुवात झाली. बेळगाव शहरातील ही सर्वात मोठी यात्रा असल्याने वडगावच्या नागरिकांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. मानकरी चव्हाण-पाटील घराण्याकडून सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले असून, मंगळवारी देवीला गाऱ्हाणे …
Read More »कॉ. कला सातेरी यांना अखेरचा लाल सलाम; मरणोत्तर देहदान
जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून मरणोत्तर देहदानाचा केला होता संकल्प बेळगाव : गुरुवार पेठ, टिळकवाडी येथील रहिवासी कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. २२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, मुलगा ऍड. अजय सातेरी, मुलगी प्रा. शीला मेणसे, सून सुनिता …
Read More »माजी महापौर नागेश सातेरी यांना पत्नीवियोग
बेळगाव : गुरुवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय 72) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार दि. 22 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, मुलगा ऍड. अजय सातेरी, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. जायंट्स आय फौडेशनच्या माध्यमातून त्यांचे मरणोत्तर …
Read More »बेळगावातील तिसरे रेल्वे ओव्हर ब्रिजवरील खड्ड्यांवर अनोखे आंदोलन
बेळगाव : बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटजवळ वाढलेल्या खड्ड्यांविरोधात येथील नागरिकांनी रांगोळी काढून अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त केला. येत्या दोन-तीन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बेळगावच्या चौथ्या रेल्वे गेटवर भुयारी मार्ग बांधकामामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे तिसऱ्या रेल्वे गेटवर वाहतुकीची कोंडी …
Read More »वडगाव ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रोत्सव उद्या!
बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला उद्या मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सुरुवात होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर वडगाव परिसरात नागरिकांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. मंदिर परिसरात पूजेच्या साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहे. मंगाई यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध खेळणी, गृहपयोगी वस्तू तसेच खाद्यपदार्थांची …
Read More »राज्य सरकारी निवृत्त कर्मचारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर
बेळगाव : निवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन मिळावे या मागणीसाठी आज बेळगाव येथे कर्नाटक राज्य सरकारी निवृत्त कर्मचारी संघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. अखिल भारतीय राज्य पेन्शनधारक संघटनेने सर्व राज्यांतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने एकत्रित स्वाक्षरी केलेले निवेदन आज निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना सादर केले. यावेळी आंदोलकांनी सांगितले की, “२०२५ …
Read More »माजी सैनिक संघटनेतर्फे 26 जुलै रोजी कारगिल, ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव!
बेळगाव : अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे येत्या शनिवार दि. 26 जुलै 2025 रोजी कारगिल आणि ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव भव्य प्रमाणात साजरे केले जाणार असून यानिमित्ताने मोठी बाईक रॅली देखील काढली जाणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बसप्पा तरवार यांनी दिली. शहरातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta