Monday , April 20 2026
Breaking News

बेळगाव

विभावरी बडमंजी हिचे चित्रकला स्पर्धेत यश

  बेळगाव : बालदिनानिमित्त बेंगळुरू येथे आयोजिण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धनावरील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी या गटात कु. विभावरी अनिल बडमंजी या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटचे सहसंचालक डॉ. एम. जी. आनंदकुमार यांच्या हस्ते विभावरीला पारितोषिक वितरित करण्यात आले असून आता तिची दिल्ली येथे …

Read More »

संत मीरा शाळेच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या स्वारा आंजणकर, रेनिवार मालशेय स्वरूप हलगेकर या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी तर अब्दुल्ला मुल्ला यांची राज्य अथेलिटीक स्पर्धांसाठी निवड झाली आहे. बळ्ळारी येथे नुकत्याच झालेल्या विद्याभारती प्रांतीय व क्षेत्रीय स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात स्वरूप हलगेकरने 110 मी अडथळा शर्यतीत प्रथम …

Read More »

सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ आंदोलन!

  बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या वादग्रस्त विधानावरून बेळगावसह राज्यभरात राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी जारकीहोळीना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर जारकीहोळी यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. सतीश जारकीहोळी समर्थकांनी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनाविरोधात आंदोलन छेडून शक्तिप्रदर्शन केले आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विधानाचा विपर्यास केला जात …

Read More »

28 नोव्हेंबरच्या चाबूक मोर्चासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : रिंगरोड विरोधात शेतकऱ्यांचा भव्य चाबूक मोर्चा 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. काळ्या आईला वाचविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव शहर परिसरातून रिंगरोड करण्यात येणार आहे.यामध्ये अनेक एकर सुपीक जमीन या रिंगरोडमध्ये जाणार असल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार …

Read More »

खाणीतील पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

  बेळगाव : दोन शाळकरी विद्यार्थ्यांपैकी एकाचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जनता कॉलनी सुळगा (उ.) ता. बेळगाव येथे आज सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच काकतीचे पोलीस पोलीस निरीक्षक सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. यानंतर पोलीस आणि अग्निशमन …

Read More »

एंजल फाउंडेशनकडून विद्यार्थ्याला मदत

  बेळगाव : इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरून त्याला आर्थिक मदत देण्यात आली आहे. सदर मदत एंजल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली असून गोरगरीब आणि गरजूंना मदत करण्याचा ध्यास एंजल फाउंडेशनने घेतला आहे. याआधीही एंजल फाउंडेशनने गोरगरीब आणि गरजूंना आर्थिक मदत करून त्यांना सहकार्य केले आहे तसेच येणाऱ्या काळातही …

Read More »

गणेश दूध संकलनातर्फे गावागावांत जनजागृती करणार : उमेश देसाई

  बेळगाव : सीमाभागात काही संस्थांकडून निर्धारित दर देण्याऐवजी प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपये कमी दिले जात आहे. प्रत्येक संस्थेला दरपत्रक दिलेले असून देखील ते लावले जात नाही. दरासंदर्भात उत्पादकांना अंधारात ठेवले जात आहे. यासाठी गावागावात जनजागृती करणार असल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे प्रमुख उमेश उर्फ प्रवीण देसाई यांनी …

Read More »

मतदार यादीत दुरुस्तीसाठी वेळापत्रक जाहीर; अंतिम मुदत 8 डिसेंबर

  बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने छायाचित्रासमवेतच्या मतदार यादीत किरकोळ दुरुस्तीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. तक्रारी दाखल करण्याची अंतिम मुदत 8 डिसेंबर असून तक्रार निवारण 26 डिसेंबरला होणार आहे. तर अंतिम यादी 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासाठी 4 डिसेंबरपर्यंत जनजागृती केली जाणार आहे, असे मुख्य निवडणूक …

Read More »

कावळेवाडीत किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

  बेळगाव : कावळेवाडीत राष्ट्रपिता म. गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे दरवर्षीप्रमाणे किल्ला स्पर्धेचे याही वर्षी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात गावातील देवालयात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पी. आर. गावडे उपस्थित होते. प्रांरभी शिवप्रतिमेचे पूजन मोहन तरवाळ यांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक …

Read More »

जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार जाहीर

  बेळगाव : दरवर्षी बालदीनानिमित्त कै. श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिला जाणारा जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यावर्षी सरकारी मराठी मॉडेल स्कुल, येळ्ळूरची विद्यार्थिनी समीक्षा महादेव कुगजी, न्यू इंग्लिश प्राथमिक मराठी शाळा मुतगे ची योगिता यशवंत पाटील, ठळकवाडी हायस्कूलची किरण विकास लोहार, सरकारी मराठी शाळा नं …

Read More »