खानापूर : खानापूर तालुक्यातील तळवडे गावा जवळील धनगर वाड्यात एंजल फाउंडेशनने मदत दिली आहे. येथील धनगर वाड्यातील नागरिकांची परिस्थिती पाहून त्यांनी त्यांना जीवनावश्यक गोष्टी देऊ केल्या आहेत.
त्यांनी येथील नागरिकांना रेशन किट, स्वेटर, ब्लॅंकेट्स, बिस्किटे यासह अनेक आवश्यक गोष्टी देऊन मदत केली आहे. धनगर वाड्या येथे कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने येथील नागरिक आपले जीवन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. तसेच येथील नागरिकांना कोणत्याही त्याची आवश्यकता असल्यास त्यांना बेळगाव येथे येऊन सर्व साहित्य खरेदी करण्याची वेळ येत आहे. तसेच घरामध्ये एखादे साहित्य संपले असल्यास त्यांना 18 किलोमीटर जंगलातून वाट काढत त्यांना सामान आणावे लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहून एंजल फाउंडेशनच्या वतीने मीनाताई बेनके यांनी येथील धनगर वाड्यातील नागरिकांना मदत देऊ केली आहे. यावेळी त्यांनी धनगर वाड्याला भेट दिली असता तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना कोणत्याही जीवनावश्यक गोष्टीची गरज असल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी त्यांच्या समवेत मिलन पवार, शशिकला जोशी यांच्यासह एंजल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.