Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर करंबळ येथे बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचा जाहीर सत्कार

Spread the love

खानापूर : करंबळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील यांनी आपल्या  वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा प्रातिनिधिक सत्कार समारंभ आयोजिला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. संभाजी पाटील हे होते.
यावेळी म. ए. समितीचे कोरोना योद्धे म्हणून बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचा श्री. संभाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महालक्ष्मी कोविड केंद्राच्या प्रमुखांचा सुद्धा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

सत्काराचा स्वीकार करीत शुभम शेळके यांनी कोरोनाच्या लाटेतील आपले अनुभव सांगितले. तसेच खानापुरातील सर्व घटकांनी एकत्र येऊन मराठी भाषा बळकटीसाठी आणि समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी युवा समितीच्यावतीने नारायण पाटील यांना रोपे देऊन त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.
व्यासपीठावर आबासाहेब दळवी, संभाजी पाटील, यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील, विवेक गिरी, आदी उपस्थित होते. श्री वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *