खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात रविवारी दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता समर्थ अर्बन को-ऑप. सोसायटीतर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. प्रसाद देशपांडे यांचे मधूमेहमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नावनोंदणी करणे अवश्यक आहे.
तेव्हा नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा व व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ सोसायटीचे अध्यक्ष नरहरी जोशी यांनी केले आहे.
Check Also
२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी
Spread the love वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …
Belgaum Varta Belgaum Varta