Tuesday , April 21 2026
Breaking News

झुंजवाड (के एन) येथे विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने एकाचा जागीच मृत्यू

Spread the love

 

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील झुंजवाड (के एन) येथे पत्र्याच्या शेडला विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने निवाऱ्याखाली थांबलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पावलेल्या युवकाचे नाव मोहन (दीपक) नारायण पाटील (वय 38) रा. झुंजवाड के. एन. असे आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, झुंजवाड के एन येथे श्री. सुरेश पाटील यांच्या घरी नवीन बांधण्यात आलेल्या घराचा वास्तुशांती कार्यक्रम होता. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वास्तुशांती कार्यक्रम झाल्यानंतर जेवणावळी कार्यक्रमही पार पडला. दरम्यान स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेले सर्व भांडी साहित्य एका जवळच्या पत्र्याच्या शेडखाली ठेवण्यात आले होते. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने त्या शेड खाली काही मंडळी उभी होती. त्या ठिकाणी लोखंडी पत्र्याच्या सेड जवळून सुरेश पाटील यांच्या घरातून लाईट पेटवण्यासाठी घेऊन गेलेली एक विद्युत तार होती. वादळी पावसामुळे लोखंडी पत्र्याचे विद्युतभारित तारेला पत्र्याचे घर्षण झाल्याने त्या विद्युतभारित तारेचा प्रवाह पत्र्याला लागला व त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांना हि त्या विद्युतभारित प्रवाहाचा झटका बसल्याचे समजते. त्याच ठिकाणी थांबलेले दीपक नारायण पाटील यांचा थेट त्या पत्राला स्पर्श झाल्याने ते बाजूला पडले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान गावातील अनेक मंडळीही त्या ठिकाणी उपस्थित होते.
घडलेल्या प्रकाळामुळे अनेकांच्या धास्ती निर्माण झाली व त्यानंतर विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. तातडीने जखमी अवस्थेत दीपक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने घोषित केले. मयत दीपक पाटील यांच्यावर शुक्रवारी खानापूरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी घर मालक सुरेश पाटील यांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याची तक्रार दीपक पाटील यांच्या पत्नीने पोलिसात केली आहे त्याचा पोलीस तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *