Wednesday , February 18 2026
Breaking News

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा…

Spread the love

 

खानापूर : पुन्हा एकदा एक दिवस शाळेसाठी या उपक्रमा अंतर्गत इयत्ता दहावीच्या 2003-2004 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे आयोजित करण्यात आला. या स्नेह मेळाव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मिळण्याचे चेअरमन श्री. तुकाराम हनुमंतराव साबळे होते. व्यासपीठावर आजी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्वागत गीतानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी, गुरुजनांच जल्लोषी स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रती असलेली ओढ आणि जुन्या आठवणींना उजाळा या निमित्ताने या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन केले यावेळी त्यांनी आपल्या त्यावेळच्या गुरुजनांचा सन्मानही केला त्यांच्या प्रति असलेली आदर भावना प्रत्येकाने व्यक्त केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुजनांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर सर्व माजी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सी. एस. कदम यांनी प्रास्ताविक केले निवृत्त क्रीडाशिक्षक दळवी, एस. जी. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. निवृत्त मुख्याध्यापक व्ही. बी. होसुर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपापली मनोगते व्यक्त करत शाळेबद्दलची असलेली ओढ व्यक्त करत आणि शाळेबद्दल कायमस्वरूपी कटिबद्ध राहण्याची सदिच्छा दाखवली. कार्यक्रमाच्या शेवटी तुकाराम हनुमंतराव साबळे यांनी अध्यक्ष समारोप करत शाळेच्या जडणघडणीमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोलाचा आहे असे मत व्यक्त केले. आभार एस. आय. काकतकर यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए. जे. सावंत यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर -पणजी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी दुसऱ्या टप्प्यातील सर्वे 16 आणि 17 फेब्रुवारीला

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर -पणजी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यांचे सीमांकन अर्थात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *