Sunday , November 22 2026
Breaking News

यशाची शिखरं सर करणाऱ्या म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाची तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत अभिमानास्पद वाटचाल

Spread the love

 

बेळगाव : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश केवळ खानापूर तालुक्यासाठी व ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे महत्त्वाचे कार्य या महाविद्यालयामार्फत केले जाते, ज्याची साक्ष नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेतील त्यांच्या दैदिप्यमान यशावरून मिळते.
तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये कला शाखेची विद्यार्थिनी नफिसा सनदी हिने चित्रकलेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर वाणिज्य शाखेच्या संचिता गावळकर व जोया सनदी या जोडीने प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय स्थान मिळवले. मूकअभिनय प्रकारात कला शाखेच्या श्रेया भोसले हिने तृतीय क्रमांक पटकावला, तसेच याच शाखेच्या संघाने लोकनृत्य/जानापद समूह नृत्यामध्ये उत्कृष्ट समन्वय साधत तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय, द्वितीय पी यु सी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी रंजीता खानापुरी हिने कन्नड निबंध लेखनात द्वितीय क्रमांक मिळवला आणि कला शाखेच्या प्रेमा कोलकार हिने आपल्या सुमधूर आवाजात भावगीत सादर करून द्वितीय क्रमांक आपल्या नावावर केला.
केवळ संस्कृतीच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर कॉलेजचा झेंडा अभिमानाने फडकवत आहेत. खेळाडूंना मिळणारे मैदान, साहित्य आणि योग्य सराव यामुळे विद्यार्थी प्रत्येक खेळात हिरिरीने भाग घेतात. तसेच शैक्षणिक सुवर्णपरंपरा राखत गतवर्षीच्या पी.यू.सी. वार्षिक परीक्षेत खानापूर तालुक्यातून पहिली पाच क्रमांकांची उज्ज्वल परंपरा महाविद्यालयाने कायम राखली असून, बोर्डाच्या परीक्षेतील उत्तम निकालाकडे वाटचाल सुरू आहे.
या यशामागे समर्थ नेतृत्व आणि कुशल मार्गदर्शकांची भक्कम जोड असून मराठा मंडळाच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई नागराजू यांच्या दूरगामी विचारांमुळे संस्थेतील गुणवत्तेला नवे आयाम मिळाले आहेत. संचालक मंडळातील श्री. शिवाजीराव पाटील व श्री. परशराम गुरव यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा मिळाली आहे. तसेच प्राचार्य श्री. अरविंद पाटील व सर्व प्राध्यापक वर्गाचे अनमोल मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे. याच बरोबर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री राहुल जाधव यांच्याही शुभेच्छा या गुणवंत विद्यार्थिंनी सोबत आहेत.
थोडक्यात सांगायचे तर, ‘म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय’ आज खानापूर तालुक्यात शिक्षणाचे माहेरघर बनले आहे. शिस्त, संस्कृती आणि उच्च गुणवत्ता या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा जो वसा घेतला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद असून भावी पिढीसाठी एक आदर्श निर्माण करणारा आहे. यामुळेच सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे , पालक वर्गाचे आणि मार्गदर्शक शिक्षकवृंद यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा

Spread the love  गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *