खानापूर (प्रतिनिधी) : पृथ्वीमातेचे आपापल्या विध्वंसक कृत्यांमुळे शोषण होत आहे. आणि आपली पर्यावरण प्रणाली लोप पावत आहे. यासाठी पुन्हा पर्यावरण प्रणाली संतुलनात आणण्यासाठी बरीच कारणे आवश्यक आहेत. म्हणून निरोगी आणि टिकाऊ वातावरण केवळ आपल्यासाठी नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. आपण नेहमी जबाबदार वर्तन दाखवुन हवा आणि पाणी तसेच वन्यजीवांचे संरक्षण केले पाहिजे आधिक झाडे लावून आम्ही संपूर्ण मानवतेचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणाचे औचित्य साधुन प्रत्येकाने झाडे लावून ती जोपासली पाहिजे, असे विचार खानापूर वनविभागाचे एसीएफ संतोष चव्हाण यांनी खानापूर तालुक्यातील गंगवाळी वनविभागात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोप लागवड करताना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला खानापूर आरएफओ कविता इरानट्टी, शिंदोळी ग्राम पंचायत सदस्य राजू पाटील, खानापूर लायन्स क्लबचे प्रकाश गावडे, श्री. शिंदे तसेच वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खानापूर आरएफओ कविता इरानट्टी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली.
तसेच झाडाना सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला.
खानापूर तालुक्यात विविध भागात ५ जुन ते १२ जुन पर्यंत पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी आभार आरएफओ कविता इरानट्टी यांनी मानले.
