Monday , September 21 2026
Breaking News

सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही : मनोज जरांगे

Spread the love

 

जालना : सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. आमच्या व्याख्येनुसारच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. हे आरक्षण मनोज जरांगे यांनी मान्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज मराठा समाजातील समनव्यक आणि आंदोलकांची बैठक बोलावली. त्यानंतर आपलं मत व्यक्त केले. मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या. आमचंच आरक्षण आम्हाला द्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

समाजासाठी आजचा निर्णय महत्वाचा आहे. आजची बैठक तुमचं ऐकून निर्णय घेण्यासाठी आहे. आमरण उपोषण करू नका म्हणून मनोज जरांगें यांच्याकडे आंदोलकांची आग्रही मागणी.

करोडो मराठ्यांची ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. कोकणमध्ये पुरावे सापडत नव्हते म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहे हे ते म्हणत होते. कुणबी नकोय ते आमच्यावर रुसायला लागलेत. जे रूसत होते, कुणबी नको म्हणून त्यांना काल कुणबी आरक्षण मिळाले, आता विरोध करणारे कोणी राहिले नाही मग आता सरसकट करायला काय हरकतय? सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्या शिवाय सरकारला सुट्टी नाही. कुणबी आणि मराठे एकच असल्याचा एकाच ओळींचा कॅबिनेट निर्णय आवश्यक आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *