Sunday , September 20 2026
Breaking News

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर; ईडीला न्यायालयाकडून झटका

Spread the love

 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांना गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा दिलासा दिला. याआधी सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर ते पुन्हा तिहार तुरुंगात गेले होते. त्यांनी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आज त्यांना दिलासा मिळाला आहे.

ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांच्या कोर्टाने त्यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी जामीनपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी ४८ तासांचा अवधी द्यावा, अशी विनंती ईडीने ट्रायल कोर्टाला केली. मात्र या आदेशाला स्थगिती दिली जाणार नसल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले आहे.

ट्रायल कोर्टाने सांगितले की, जामीनपत्र उद्या न्यायाधीशांसमोर सादर केला जाईल. केजरीवाल शुक्रवारी तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. केजरीवाल यांच्या सुटकेआधी ईडी दिल्ली हाय कोर्टात जाऊन ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती मागू शकते, असं बोललं जात आहे. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.

सलग दोन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीने गुरुवारी न्यायालयात दावा केला होता की, दारू घोटाळ्यात वापरलेल्या पैशाचे फोटो जप्त करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *