Sunday , July 26 2026
Breaking News

विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुक आज जाहीर होणार

Spread the love

 

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आज शुक्रवारी विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा तारखा जाहीर करणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून त्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचा तारखा जाहीर करेल, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार का?
केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार असल्याच्या यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने एक ट्विट केलं आहे. पण यामध्ये नेमकी कोणत्या राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातात हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, जम्मू-कश्मीर, झारखंड, हरियाणा या राज्यांबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचीही घोषणाही होणार का? याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत देखील निवडणूक आयोग काय निर्णय घेतं? हे आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतरच स्पष्ट होणार आहे.

३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा होणार
जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० बाबत गेल्या वर्षी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२४ अगोदर घेण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांनी जम्मू काश्मीरचा दौरा करत तयारीचा आढावा घेतला होता. दरम्यान, ३७० कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आज केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीरच्या निवडणुकीबाबत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *