Saturday , November 7 2026
Breaking News

थरारक घटना! खाण माफियांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला चिरडलं; दगडांनी भरलेला ट्रक अंगावर घातल्याने जागीच मृत्यू

Spread the love

 

हरियाणा : दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी दगडाने भरलेला ट्रक संबंधित पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर घातला. या दुर्दैवी घटनेत पोलीस अधिकार्‍याच्या जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर खाण माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपींना जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सुरेंद्रसिंग बिश्नोई असं मृत पावलेल्या पोलीस अधिकार्‍याचं नाव असून ते डीएसपी दर्जाचे पोलीस अधिकारी होते. ही घटना हरियाणातील नूह याठिकाणी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरवली पर्वत रांगेत पाचगाव येथे अवैध पद्धतीने दगडांचं उत्खनन केलं जात असल्याची गुप्त माहिती सुरेंद्रसिंग यांना मिळाली होती. त्यानुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास सुरेंद्रसिंग पोलीस पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

About Belgaum Varta

Check Also

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love    ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *