Monday , September 21 2026
Breaking News

गुलाम नबी आझाद बंडखोरी करण्याची तयारीत

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकृतीच्या कारणास्तव गुलाम नबी आझाद यांनी नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान पक्षावर गेल्या काही काळापासून नाराज असलेले गुलाम नबी आझाद पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
मंगळवारी काँग्रेस पक्षाने प्रचार समिती तयार केली होती. यामध्ये ११ नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या समितीचे स्थायी सदस्य होतेय. तारिक हमीद कारा यांची प्रचार समितीचे उपाध्यक्ष तर जीएम सरुरी यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद आधीच पक्षाच्या अखिल भारतीय राजकीय घडामोडी समितीचे सदस्य असल्याने यावर त्यांचा आक्षेप आहे. गुलाम नबी आझाद पक्षाचे दिग्गज नेते असून माजी मुख्यमंत्रीदेखील आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं असून, पक्षाची अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *