Friday , November 6 2026
Breaking News

रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठी दुर्घटना, मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण पडले

Spread the love

 

इंदूर : देशभरात आज रामनवमीचा उत्साह असतानाच मध्य प्रदेशातील इंदूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडले. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुर्घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. तर अरुंद रस्त्यांमुळे मदतकार्य करण्यात अडचणी येत आहेत.

मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि ऍम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या नव्हत्या. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरसेवक यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्यासह सर्व एमआयसी सदस्य बैठक सोडून अपघातस्थळी निघाले. यासोबतच अनेक राजकारणीही पोहोचले आहे. मदतकार्यासाठी डायव्हर्सना पाचारण करण्यात आलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love    ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *