Monday , September 21 2026
Breaking News

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; निवडणुकांच्या रिंगणात उतरणार सर्व केंद्रीय मंत्री

Spread the love

 

नवी दिल्ली : आगामी काळातील लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. संघाकडून मिळालेल्या सल्ल्यांनंतर राजकीय समिकरणांबरोबरच जातीय समिकरणे सुधारण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान पक्ष नेतृत्वाकडून एक मोठा निर्णय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याची माहिती सध्या मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व मंत्री आणि खासदरांना तयार राहण्याच्या सूचना पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्या मंत्र्याना भाजपकजडून निवडणूक लढवण्याची संधी मिळते, हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

माहितीनुसार, भाजपच्या पक्ष नेतृत्वाकडून राज्यसभेतील जे खासदार केंद्रात मंत्रीपद भूषवतात त्यांना लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी सार्वत्रिक लोकसभेच्या जागांसाठी मतदारसंघ निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना देखील या सूचना पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता भाजपकडून कोण निवडणुकांच्या रिंगणात उतरणार याची देखील सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *