Sunday , July 26 2026
Breaking News

अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्याची शिक्षा; न्यायालयाने ठोठावला 5000 चा दंड

Spread the love

 

चेन्नई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. चेन्नई मधील रायपेटमध्ये जया प्रदा यांचे स्वत:च्या मालकीचे थिएटर आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या चित्रपटगृहात काम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ईएसआयची रक्कम भरलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

अभिनेत्री जया प्रदा यांनी चित्रपटातील कर्मचाऱ्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता मात्र अभिनेत्री जया प्रदा आणि त्यांच्यासह इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *