Sunday , July 26 2026
Breaking News

कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश

Spread the love

 

नवी दिल्ली : कॅनडानं भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आणि एका उच्च भारतीय राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले. कॅनडाचं कृत्य गांभीर्यानं घेत भारतानंही जशास तसं उत्तर दिलं आहे. कॅनडाच्या राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत कॅनडाच्या राजदुताला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं वक्तव्य केलं आणि संपूर्ण देशभरात खळबळ माजली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी थेट भारतावर आरोप केले. एवढंच नाही तर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही तशीच वक्तव्य केली. यानंतर भारतानं एक निवेदन जारी करून कॅनडाकडून आरोप फेटाळून लावले. कॅनडानं केलेला हत्येचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं भारतानं म्हटलं आहे.

कॅनडाच्या राजदुतांच्या हकालपट्टीवर परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?
कॅनडाच्या वतीनं करण्यात आलेल्या आरोपांनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं एक निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. परराष्ट्रानं म्हटलं आहे की, कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना आज पाचारण करण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की, भारतानं नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ कॅनेडियन राजदुताला देश सोडण्यास सांगण्याचा निर्णय घेतला आहे. राजदुताला पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलं आहे की, “हा निर्णय कॅनडाच्या राजदुताचा आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग यावर भारत सरकारची वाढती चिंता प्रतिबिंबित करतो.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *