निपाणी (वार्ता) : मागील तीन वर्षांपासून कोव्हीड काळात सुरक्षतेच्या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी बसेसेवा बंद केल्या होत्या. आता स्थिती सुरळीत झाली असूनही बऱ्याच बसेस अजूनही बंद आहेत. या सर्व गोष्टींचा विद्यार्थी वर्ग, तसेच सर्वसामान्य जनता आणि वयस्कर वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व मार्गावरील बस सेवा सुरळीत करावी, मागणीसाठी येथील आम आदमी पक्षातर्फे तहसीलदार कार्यालयामार्फत वाहतूक मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
आम आदमी पक्षाचे निपाणी भाग अध्यक्ष डॉ. राजेश बनावन्ना म्हणाले, प्रवसाकरिता फक्त बस व वडाप सेवा उपलब्ध आहे. बससंख्या कमी झाल्याने निपाणी परिसरातील ५० पेक्षा अधिक गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरामध्ये ए. सी. स्लीपर कोच/ मेट्रो/ एक्स्प्रेस ट्रेन/ बुलेट ट्रेन वगैरे सारख्या सेवा उपलब्ध नाहीत. प्रामुख्याने फक्त बस सेवा आहेत. आजारी व्यक्तीं, व्यापारी, ग्राहक, शाळा कॉलेज साठी विद्यार्थ्यांना बस प्रवास करावा लागतो. धोकादायक स्थितीत विद्यार्थी बसबाहेर लोंबकळत प्रवास करतात. बेळगांव जिल्ह्यासाठी नविन बसेस गरज असताना जुन्या बसेस पुरविण्यात येतात. हा बेळगांव जिल्हावरील अन्याय आहे.
या सर्व वरील गोष्टींविषयी वाचा फोडण्यासाठी आम आदमी पार्टी निपाणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. राजेश बनावन्ना, आदर्श गिजवणेकर, वासिम पठाण, नंदकिशोर कंगळे, लतिफा पठाण, राजू हिंग्लजे, अक्षय कार्वेकर, दीपक शिंदे, प्रकाश पोळ, पंकज कांबळे, सुनील केळगडे, इराप्पा वडर, सलीम मुजावर, अनिल वडर, मैनुद्दीन रिकिबदर, संतोष वडर, अयुब सुतार, सुनिल वडर, युवराज उपस्थित होते.