
निपाणी (वार्ता) : येथील खैरमहंमद पठाण हायस्कूल, उम्मूल फुक्रा माध्यमिक शाळा आणि सरकारी उर्दू शाळेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबर उत्साहात पार पडले. अध्यक्ष स्थानी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद तर प्रमुख पाहुणे म्हणून आर. ए. कागे उपस्थित होते.
एच. जी. मुल्ला यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी एम. ए. उस्ताद, आर. एम. मुल्ला, एन. एन. वाचमेकर, गौस मोमीन, पाच्छापुरे, जकीर काजी व मसुरगुप्पी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी परीक्षांना न घाबरता सामारे जावे. सर्व विषयांचा शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार जिद्द, चिकाटी व परिश्रमपूर्वक अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे. आपले पालक, संस्था व गावाचे नावलौकिक करावे असे सांगितले
यावेळी फजल पठाण,एम. पीरजादे, आय. जी. माळी, इम्तियाज मोकाशी, एच. के. पटवेगर, एम. ए. खानापुरे, आर. उत्पन्न राजवी, आय. ए. मुल्ला, ए. ए. बी. पठाण, आय. ए. पटेल, ए. एस. नदाफ, एस. ए. मुल्ला, ए. ए. मुल्ला, ए. बी. जैनापुरे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व उपस्थित होते.