
निपाणी (वार्ता) : येथील अमन एज्यूकेशन आणि सोशल वेल्फेअर सोसाईटीच्या सनशाईन नर्सिंग कॉलेजतर्फे शिवाजीनगरातील निनाई देवी सांस्कृतिक भवनात मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा.एन. आय. खोत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर नर्सिंग कॉलेजच्या अध्यक्षा एन. ए. पठाण, सचिव एस. एन. पठाण, नगरसेवक विलास गाडीवड्डर, डॉ. आदम करणाजी, डॉ. अजरुद्दीन सोलापुरे उपस्थित होते.
पुंडलिक कांबळे यांनी प्रास्ताविक केले. खोत यांनी, सध्याच्या काळात नर्सिंगचे महत्व स्पष्ट करून मोफत आरोग्य शिबिरांची सध्या गरज आहे. त्यासाठी सहकार्य असल्याचे सांगितले. विलास गाडीवड्डर यांनी, आरोग्य आपली खरी संपत्ती असून आरोग्याला जपण्याचे आवाहन केले.
शिबिरामध्ये शहर व पण घरातील रुग्णांची रुग्णांची तपासणी करून औषधे देण्यात आली. शिबिरास अक्सा बागवान, सना किल्लेदार, रेशमा राठोर, अल्फिया करणाजी, हिना जमादार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सन्मती कुंभार आभार मानले.