निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.१) माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार्य उत्तम पाटील यांनी केले. सोमवारी (ता.२९) दुपारी आपल्या कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर सकाळी १० वाजता माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्ष पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन शहर आणि ग्रामीण भागात प्रियांका जारकीहोळी यांचा प्रचार सुरू ठेवला आहे. त्यानिमित्ताने कोपरा सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. त्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आठपैकी निपाणी विधानसभा मतदारसंघातून जारकीहोळी यांना उच्चांकी मते मिळणार आहेत. यावेळी काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी, निपाणी मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे आघाडी धर्म पाळला जात आहे. उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते जारकीहोळी यांच्या तुझ्यासाठी झटत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, अशोककुमार असोदे, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, संजय पावले, दिलीप पठाडे, सचिन गारवे, दीपक सावंत, शेरू बडेघर, सुनील, शेलार विशाल गिरी, विनायक वडे, इम्रान मकानदार, अनिल संकपाळ, शिरीष कमते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.