Monday , September 21 2026
Breaking News

आंतर शालेय वक्तृत्व, चित्रकला स्पर्धेत २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

Spread the love

 

नूतन मराठी विद्यालयात आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्रा. चंद्रहास धुमाळ यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आंतर शालेय वकृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा झाल्या. त्यामध्ये २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.अध्यक्षस्थानी माध्यमिकचे मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या अध्यक्षा अलका धुमाळ उपस्थित होत्या. याशिवाय संस्थेचे सचिव विक्रमादित्य धुमाळ, श्रीकांत काटे, विजय टवळे, प्रभाकर पाटील, राजकुमार सावंत ,इर्शाद कोचरगी प्रशांत नाईक यांची उपस्थिती
होती. मान्यवरांच्या हस्ते धुमाळ यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मुख्याध्यापक पचंडी, महेक जगदाळे व प्रदीप पाटील
यांनी प्रा. धुमाळ त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. चित्रकला व वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून यू. आर. पवार, प्रदीप पाटील, एस. पी.जगदाळे, एस. के. जोशी,एस ए पुंडे, एस. आय किवंडा
यांनी काम पाहिले.
शालेय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत लहान १ ली ते ४ थी गटात राजरत्न चव्हाण, शौर्य बाचणे, अनन्या पाटील, ५ वी ते ७ वी गटात महेक जगदाळे, आराध्या घोडके, अर्णव वाघमारे,
८ वी ते १० वी गटात प्रथमेश कांबळे, प्राप्ती बाळामारे, समर्थ कुंभार यांनी यश मिळविले. आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत १
ली ते ४ थी गटात विभावरी पाटील, वृषाली कदम, सारा कांबळे, ५ वी ते ७ वी गटात रिद्धी सूर्यवंशी, संस्कृती माने, श्रावणी पाटील आणि ८ वी ते १० वी गटात पारितोष पाटील, तनया गावडे, अदिती पीसोत्रे यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकावला. शालेय पातळीवरील चित्रकला स्पर्धेत १ ते ४ थी गटात धैर्यशील शिंदे,
वेदिका, आंबुस्कर, आस्था कमते, ५ वी ते ७ वी गटात आराध्या घोडके, कीर्ती पाटील, आविष्कार घोटने, ८ वी ते १० वी गटात पियुष मातिवड्डर, श्रुती रेपे, सार्थक चव्हाण यांनी यश मिळविले
आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत १ ली ते थी गटात अमिरा मुल्ला, शौर्य शेवाळे, आराध्या चौगुले, ५ वी ते ७ वी गटात स्वराली मोरे, दुर्वा कुन्नुरे, सन्मित्र मगदूम ८ वी ते १० वी गटात सुयोग कांबळे, अमृता पांडव, अली पटेल यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *