Monday , September 21 2026
Breaking News

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने बोरगाव ‘अरिहंत’तर्फे डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव केएलई संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार प्रभाकर कोरे यांना त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक, सामाजिक व सार्वजनिक जीवनातील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानिमित्त बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांनी डॉ. कोरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
सहकारत्न उत्तम पाटील यांनी, डॉ. कोरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शैक्षणिक, सहकार, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी वेचले आहे. अशा व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार मिळणे आवश्यक होते. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची उंची वाढली आहे. कर्नाटक–महाराष्ट्र सीमाभागासाठी ही अभिमानाची बाब आहे.अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा सेवावृत्ती, प्रामाणिक नेतृत्व आणि समाजनिष्ठेचा सन्मान आहे. त्यामुळे युवकांना समाजकार्य व राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. डॉ. कोरे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या पुढील काळातही समाजकार्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी डॉ. प्रभाकर कोरे साखर कारखान्याचे संचालक महावीर कात्राळे, शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी उपाध्यक्ष इंद्रजीत पाटील, उद्योजक नाभिराज खोत, तात्यासाहेब चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होत.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *