Sunday , July 26 2026
Breaking News

गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या बस स्थानकाच्या भिंती

Spread the love

 

दंडात्मक कारवाईची मागणी ; निपाणीतील प्रवाशांना दुर्गंधीचा सामना

निपाणी (वार्ता) : प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या येथील बसस्थानक परिसरात जिकडे-तिकडे गुटखा आणि तंबाखू खाऊन थुंकल्याचे दिसून येत आहे. या बस स्थानकाच्या भिंती तंबाखूयुक्त गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. येथे येणाऱ्या महिला विद्यार्थिनी आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी निपाणी आगाराने यासंदर्भात कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
शासनाकडून एकीकडे स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे निपाणी येथील बस स्थानकावर मात्र चित्र अगदीच उलटे दिसून येत आहे. येथे पसरलेली घाण व दुर्गंधीचे साम्राज्य बघता या परिसरापुरता तरी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
कधी काळी पांढऱ्या शुभ्र असलेल्या बस स्थानकाच्या भिंती आता तंबाखू आणि गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी अक्षरशः लाल झाल्या आहेत. निपाणी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतून प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र स्थानकात आल्यानंतर प्रवाशांचे स्वागत स्वच्छतागृहातील घाणीने बरबटलेल्या भिंती व दुर्गंधीयुक्त कोपऱ्यांनी होत आहे.
बस स्थानकातील स्वच्छतागृहातील कोपरा, खांब आणि भिंतीवर गुटखा व तंबाखू खाऊन थुंकल्याचे डाग स्पष्टपणे दिसत आहेत. कचरा टाकण्यासाठी आगाराकडून कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यात आली असतानाही अनेकजण भिंतीचाच वापर ‘थुंकण्यासाठी’ करत असल्याचे दिसून येत आहे. या अस्वच्छतेमुळे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. बस स्थानक व्यवस्थापनाने केवळ सूचना फलक न लावता, प्रत्यक्ष कारवाई करून थुंकणाऱ्यांकडून दंडवसूल करावा आणि स्थानकाची रंगरंगोटी करून स्वच्छता राखावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
——————————————————————-
‘बस स्थानक ही सार्वजनिक मालमत्ता आहे. ती स्वच्छ राखणे आपले कर्तव्य आहे. प्रवाशांनी याचे भान ठेवणे गरजेचे आहे. यापुढे काळात पिचकारी मारणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.’
-संगाप्पा, आगार प्रमुख, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *