Sunday , September 20 2026
Breaking News

‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्कार मिळाल्याने ‘अरिहंत’तर्फे मीनाक्षी पाटील यांचा सत्कार

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील मीनाक्षी रावसाहेब पाटील यांचे धार्मिक कार्य आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत देशपातळीवर त्यांना मिळालेला हा सन्मान बोरगावसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. त्यानिमित्त त्यांचा अरिहंत परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
पी. के. पी. एस.चे सी.ई.ओ. आर.टी.चौगुले यांनी मीनाक्षी पाटील यांनी सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) यांच्यासमवेत अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात निष्ठेने कार्य करत विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या‌ सेवाभावी वृत्तीमुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास हातभार लागला आहे. विशेषतः महिला सक्षमीकरण, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि समाजातील गरजू घटकांना मदतीसाठीचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
प्राथमिक कृषी संघ, अरिहंत दूध डेअरी, अरिहंत स्पिनिंग मिल, अरिहंत गारमेंट्स, जैन बस्ती कमिटी, अरिहंत शाळा, अरिहंत क्रेडिट सहकार संस्था, आर. ए. पाटील पब्लिक स्कूल, वितराग महिला मंडळ, वीर सेवा दल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मीनाक्षी पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *