Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणकर सरकार राजवाड्यातील मानाची पालखी‌, सासनकाठी शिंगणापूरकडे रवाना

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यातील मानाची सासनकाठी व पालखी श्री क्षेत्र त्र शिखर शिंगणापूर महादेव मंदिराकडे निपाणी येथून रवाना झाली. त्यानिमित्त श्रीमंत दादाराजे देसाई सरकार, मानकरी व मान्यवरांच्या हस्ते सासनकाठीची पूजा करण्यात आली. शिखर शिंगणापूर येथे चैत्र महिन्यानिमित्त निपाणका सरकार घराण्यातील मानाची पालखी आणि सासनकाठी शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त जाते. यंदाही पालखी व सासनकाठी निपाणकरांचे मानकरी विजय सासणे व श्री जयवंत सासणे यांच्या घरातील पालखीची श्रीमंत दादाराजे निपाणकर विद्यमान राजेसाहेब यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजाअर्चा करून आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांनी पालखीसह काठीची सासणे गल्लीतून बसवेश्वर सर्कलपर्यंत सवाद्य मिरवणूक काढली. त्यानंतर भक्तगण शिखर शिंगणापूरच्या दिशेने रवाना झाले. यावेळी श्रीमंत युवराज सिद्धूजीराजे निपाकर हेमंत सासणे, किशोर सासणे, सुधाकर पाटील, किसन मोरे, सुधाकर भालेभालदार, रमेश भालेभालदार, गजानन तारळे, सुजित गायकवाड, अरविंद कमते, धनंजय पाटील, सुनील पाटील यांच्यासह सासणे गल्लीतील नागरिक आणि भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *