Monday , May 25 2026
Breaking News

निवाऱ्याअभावी प्रवासी ऊन, पावसातच!

Spread the love

 

निपाणी मतदार संघातील अनेक गावात गैरसोय : विद्यार्थी, महिला, वृद्धांची अडचण

निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील सर्वच ग्रामीण भागात निपाणी आगारातर्फे बस सुविधा सुरू आहे. पण प्रवाशांना थांबण्यासाठी अनेक गावांमध्ये बस थांब्यावर निवारा शेडच नसल्याने ऊन पावसात प्रवासी, विद्यार्थी वृद्ध नागरिकांना बसची वाट बघत ऊन, पावसातच तासनतास थांबावे लागत आहे. उन्हाळ्यात तर उस्ष्यामुळे गैरसोय होत असून संबंधितांनी याकडे लक्ष देऊन निवारा शेड नसलेल्या गावांमध्ये प्रवाशासाठी शेड उभारून गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
निपाणी मतदार संघातील सर्वच गावातील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज निपाणीस ये-जा करत असतात. पण उन्हाळा आणि पावसाळ्यात संबंधित गावांमध्ये प्रवाशासाठी निवारा शेड नसल्याने ऊन पावसाचेच थांबावे लागत आहे. कोणत्याही प्रकारचा निवारा होईल, अशा पद्धतीचे थांबे नसल्याने या ठिकाणच्या प्रवाशांना ऊन, पावसाचा सामना करत इच्छितस्थळी जाण्यासाठी बस व इतर वाहनांचा वाट पाहावी लागत आहे. त्यातच जलद सेवेच्या नावाखाली अनेक गावात सर्वच बस थांबत नसल्याने प्रवाशांची विशेषतः विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.
निवारा शेड अभावी रस्त्याच्या कडेलाच विद्यार्थी प्रवासीयांनी नोकरदारांना थांबावे लागते. गावात स्थानकाजवळ परिसरात सकाळ सायंकाळ मोठी गर्दी होत आहे. अशावेळी भरधाव ये- जा करणाऱ्या वाहनामुळे अपघातांची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी निवारा शेड नसलेल्या ठिकाणी भेट देऊन प्रवाशांची सोय करण्याची मागणी होत आहे.
——————————————————————-

प्रवासी निवारा शेड नसलेली गावे
निपाणी मतदारसंघात मांगुर, कुन्नूर, आडी, सौंदलगा, मुख्य बसस्थानक, मांगुर फाटा, यमगर्णी, गळतगा, बेडकीहाळ, बेडकीहाळ सर्कल, बोरगाववाडी फाटा, कारदगा, ढोणेवाडी, कसनाळ, मानकापूर, शिवापुरवाडी येथे निवारा शेड नाहीत. याशिवाय काही गावात शेड एकीकडे तर बस दुसरीकडे अशी अवस्था आहे.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *