Sunday , July 26 2026
Breaking News

यरनाळच्या अंबिकादेवी यात्रेतील शर्यतीत मुरगुडच्या राणा मांगलेंची बैलगाडी प्रथम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : यरनाळ (ता. निपाणी) येथील ग्रामदैवत अंबिकादेवी यात्रेनिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये मुरगूडच्या राणा मांगले यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १० हजार १ रुपये रोख व ढाल बक्षीस मिळविले. या शर्यतीत रेंदाळच्या शरद पुणेकर यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे ७००१ रुपये आणि कणेरीच्या सुनील पाटील यांच्या बैलगाडीने ५००१ रुपये रोख व ढाल पटकवले.

जनरल घोडा गाडी शर्यतीत शिवाजी खामकर- यरनाळ, चिखली नाना-चिखली यांनी ५००१ रुपये रोख व ढाल आणि ३००१ रुपये रोख व ढाल अशी बक्षिसे मिळवली. आदत घोडा -बैलगाडी शर्यतीत प्रमोद डावरे, हुपरी राणा वकिशोर पाटील यांच्या गाड्यांनी अनुक्रमे ५००१ रुपये व ढाल, ३ हजार १ रुपये व ढाल व २००१ रुपये आणि ढाल अशी बक्षीसे मिळवली.
नवतर जनरल घोडा गाडी शर्यतीत चिखली नाना, किशोर पुजारी वप्रमोद डावरे यांनी अनुक्रमे ५००१ रुपये व ढाल, ३ हजार १ रुपये व ढाल आणि २००१ रुपये व ढाल अशी बक्षीसे पटकावली.
समरसिंह दौलतराव निंबाळकर यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले. विजेत्यांना समरसिंह निंबाळकर, दौलतराव निंबाळकर, सिद्धोजीराव निंबाळकर, दिग्विजय निंबाळकर, सर्जेराव भोसले, सुरेश घाटगे, आनंदा पवार, संभाजी घाटगे, गणपती डावरे, सुरेश पोवार, अभिजीत मोहिते, दीपक पाटील, आनंदा कोल्हे, अमित डावरे, सुनील वडगावे, अभिजीत डावरे, संतोष घाटगे यांच्या हस्ते देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *