Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीत लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे नगरपालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी उपप्राचार्य डॉ. आर. के. दिवाकर तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. जे. डी. कांबळे उपस्थित होते.
सागर कांबळे यांनी स्वागत तर पुंडलिक कांबळे यांनी प्रास्ताविक केले. महिला आणि मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार पण करण्यात आला.
प्रा. जे.डी. कांबळे यांनी, आजचा समाज हा फुटीर प्रवृत्तीचा बनत चालला आहे. समाजात हेवे दावे, अहंकार, द्वेष, मैत्री हीनता असे प्रकार वाढत आहेत शैक्षणिक पात्रता नसलेल्याचा बुद्धीचा विकास झालेला नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन पात्र लोकांना संधी मिळत नसल्याचे सांगितले. प्रा. डॉ. दिवाकर म्हणाले, महापुरुषांच्या विचारातील समाज निर्मितीसाठी विविध संघ, संस्था उभा करून आजच्या युवकांना दिशा देणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमास प्रा. संजय शितोळे. प्रमोद कांबळे, शरद कांबळे, कबीर वराळे, रमेश कांबळे, माधुरी मेस्त्री, अमर शिंगे, उमाकांत कांबळे, प्रा. अजित कांबळे, प्रशांत कांबळे, सागर जाधव, सागर कांबळे यांच्यासह नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *