Sunday , September 20 2026
Breaking News

पोलिसांसमोर ‘बीट द हीट’चे आव्हान

Spread the love

 

भर उन्हात कर्तव्यामुळे वाढला आरोग्याला धोका ; शहराचा पारा ४१ अंशावर

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात एप्रिलमध्येच उन्हाचा कडाका तीव्र झाला असून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोर ‘बीट द हिट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाहतूक नियंत्रणासोबतच मोर्चे, विविध जयंत्या, कार्यक्रम आणि बंदोबस्ताच्या ठिकाणी तासनतास उभे राहणाऱ्या पोलिसांना उष्णतेचा फटका बसत आहे.
शहरात सतत व्हीआयपींची वर्दळ वाढत असल्याने पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त राहावे लागते. त्यात वाहतूक कोंडीच्या नियंत्रणाबाबत जबाबदारीही पोलिसावरच आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी कर्मचारी दिवसभर कर्तव्यावर असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीरपणे चालला आहे
सध्या निपाणीत उष्णतेची लाट सुरू असून लग्न करावेलाही सुरुवात झाली आहे. दिवसभर पोलिस बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. धर्मवीर संभाजी राजे चौकासह अनेक ठिकाणी सावलीची कमतरता, सततचा उभा राहण्याचा ताप आणि वाहनांच्या धुरामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. उन्हामुळे शरीरातील पाण्याची कमतरता आणि सततचा उष्णतेचा संपर्क यामुळे धोका वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी नियमित पाणी व लिंबूपाणीचे सेवन करण्याचा सल्ला वैद्यकीय मंडळीकडून देण्यात येत आहे.
एकंदरीत पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे.
—————————————————————–
सुविधा उपलब्ध कराव्यात
बंदोबस्त व वाहतूक ठिकाणी तात्पुरते शेड उभारणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कामांच्या शिफ्टमध्ये बदल, तसेच कुलिंग, सन-प्रोटेक्शन साधनांचा वापर यांसारखे उपाय प्रभावी ठरू शकतात. याशिवाय, नियमित वैद्यकीय तपासणी व विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्वाचे आहे.
——————————————————————-
पोलिसासमोरील आव्हाने
* कडक उन्हात दीर्घकाळ उभे राहणे
* सावलीचा अभाव व उष्णतेचा थेट संपर्क
* डिहायड्रेशन व उष्माघाताचा धोका
* वाहनांचा धूर व धूळ
* विश्रांती व पिण्याच्या पाण्याची कमतरता
——————————————————————-
उपाययोजना
* बंदोबस्त ठिकाणी तात्पुरते शेड उभारणे
* थंड पाणी व ओआरएसची व्यवस्था.
* ड्युटी शिफ्टमध्ये बदल व विश्रांतीची वेळ
* सनग्लासेस, कुलिंग जॅकेटचा वापर
* नियमित वैद्यकीय तपासणी व तत्काळ उपचार सुविधा

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *