Sunday , September 20 2026
Breaking News

दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांना मरणोत्तर ‘धर्मर्षी समाजसेवा पुरस्कार प्रदान

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील भगवान श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर निशिधी अतिशय क्षेत्रमध्ये आयोजित समारंभात दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांना मरणोत्तर ‘धर्मर्षी समाजसेवा आणि ‘जैन सेवा गौरव’ हे दोनपुरस्कार प्रदान करण्यात आले. सिद्धांत चक्रवर्ती, आचार्यरत्न, श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज यांच्या २३ व्या दीक्षा जयंतीमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
धर्मप्रेमी, दक्षिण भारत जैन सभेचे माजी अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) यांनी दिलेले धार्मिक व सामाजिक योगदान आणि त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
आचार्यरत्न श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज यांनी, रावसाहेब पाटील यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शिक्षण, आरोग्य संस्कार या गोष्टींवर भर देत दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून जैन समाजाला वेगळी दिशा दिली. जैन समाजासाठी त्यांनी केलेले कार्य हे सर्वांसाठीच आदर्श असल्याचे सांगितले.
आचार्य श्रींच्या हस्ते दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी मीनाक्षी रावसाहेब पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सुजाता लगारे, धनश्री उत्तम पाटील, युवराज पाटील, मनोज पाटील, राकेश फिरगन्नावर, के. आर. बी. भक्त परिवार, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील दिगंबर जैन समाजाचे श्रावक-श्राविका उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *