Sunday , August 16 2026
Breaking News

पाण्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने नगरपालिकेतर्फे जनजागृती फेरी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि भूजल पातळी वाढविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी निपाणी नगरपालिके तर्फे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानांतर्गत जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या फेरीत म्युनिसिपल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नगरपालिकेपासून जागृती फेरीला सुरुवात झाली. ही फेरी जुनापीबी रोड, बस स्थानक, निपाणी मेडिकल, चन्नम्मा सर्कल आदी प्रमुख मार्गावरून आली. काढण्यात
या फेरीद्वारे प्रत्येक घराने पावसाच्या पाण्याची साठवण करून ते जमिनीत मुरवावे, जलस्रोतांचे संवर्धन करावे, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लहू मधाळे, विशाल लाटवडे, प्रवीण कणगले यांच्यासह कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

स्तवनिधीत स्वातंत्र्यदिन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित बाल विकास मंदिर, पी. जी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *