Monday , September 21 2026
Breaking News

जूनपासून १० हजार अंगणवाडी केंद्रात एलकेजी-यूकेजी वर्ग

Spread the love

 

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर; कार्यकर्त्यांच्या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने तोडगा

बंगळूर : राज्यातील दहा हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये येत्या जून महिन्यापासून एलकेजी व यूकेजी वर्ग सुरू करण्यात येणार असून, अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या विविध मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने फ्रीडम पार्क येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना मंत्री म्हणाल्या की, राज्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये आधीच एलकेजी-यूकेजी वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री यांच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच शिक्षण विभागाशीही समन्वय साधून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एमए, बीएडसारखी उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या अनेक महिला अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्येच एलकेजी-यूकेजी वर्ग कायम ठेवण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंगणवाडी कार्यकर्त्यांना बीएलओ (मतदार नोंदणी अधिकारी) कामातून मुक्त करण्यात आले होते. मात्र पुन्हा त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात या कामातूनही त्यांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मंत्री म्हणाल्या.

आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

“मी स्वतः महिला असल्याने अंगणवाडी कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून काम करत आहे. मंत्री झाल्यानंतर अनेक मागण्या पूर्ण केल्या आहेत. उर्वरित मागण्यांबाबतही मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला जाईल,” असे सांगत मंत्री हेब्बाळकर यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *