Monday , September 21 2026
Breaking News

बंगळूरातील राजभवनात बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे गोंधळ

Spread the love

 

बंगळूर : अत्यंत सुरक्षित असलेल्या राजभवनात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शहरातील ६० हून अधिक खासगी शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल संदेश पाठवून चिंता निर्माण करणाऱ्या घटनेनंतर आज राजभवनात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याने पोलिसांची झोप उडाली होती.
रात्री साडे अकराच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने एनआयए नियंत्रण कक्षाला फोन करून राजभवनात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ शहर पोलिसांना फोन करून माहिती पाठवली, पोलीस, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली, मात्र बॉम्ब न सापडल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हा फेक कॉल असल्याची पुष्टी होताच, विधानसौध पोलिसांना एनआयए कंट्रोल रूमच्या कर्मचार्‍यांकडून कॉल आला, गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट कॉल करणार्‍या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
घटनेनुसार, संबंधित स्टेशन पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला आणि गुगलला पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले, ई-मेल नोंदणी लॉगिन आयपी माहिती, ई-मेल चॅटसह बरीच माहिती देण्यास सांगितले. बनावट बॉम्ब संदेश पाठवणाऱ्या आरोपींना शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून पोलीस विभागाने सर्व्हर पुरवणाऱ्यांना पत्र लिहून माहिती मागवली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *