हुबळी : हुबळी येथील नेहा हिरेमठ नामक युवतीच्या झालेल्या खुनाचा तपस करण्यासाठी सीआयडी अधिकारी नेहा हिरेमठच्या घरी चौकशीसाठी पोहोचले आहेत.
नेहा हिरेमठच्या कुटुंबियांकडून माहिती जाणून घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी सीआयडी एसपी व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी नेहा हिरेमठच्या घरी पोहोचले आणि पुढील तपासासाठी हिरेमठ कुटुंबियांकडून माहिती घेतली. यावेळी नेहाची आई गीता हिरेमठ, नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांच्याकडून अधिकाऱ्यांनी चर्चा केल्याचे समजते.