बंगळुरू : एकीकडे लोकसभा निवडणुकांचा धुरळा आणि दुसरीकडे अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. उत्तर भारतात मे महिन्याच्या कडाकाच्या उन्हानं काहिली होत आहे. पण दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, 16 मेपासून बंगळुरूसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
बंगळुरूमध्ये हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा देत बंगळुरूसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्यानं लोकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं 16 मेपासून बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
देशभरात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अशातच बंगळुरूसाठी आज भारतीय हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळाचा अंदाज वर्तवला आहे. बंगळुरू शहरात 270 हून अधिक झाडं कोसळली आहेत.
16 ते 21 मेपर्यंत यलो अलर्ट
16 मे ते 21 मे पर्यंत बंगळुरूमधील हवामान खूप ढगाळ असेल. तसेच, सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याचीही शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. आठवडाभर शहरात मुसळधारेचा अंदाज आहे. 16, 17 आणि 19 मे रोजी वातावरण ढगाळ असू शकतं तसेच, अधूनमधून ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.