Monday , July 27 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगावातील एका नामांकित सहकारी संस्थेत “नोकर भरती” घोटाळा?

  बेळगाव : बेळगाव शहरात अनेक आर्थिक संस्था कमी वेळेत नावारूपास आल्या आणि त्याचप्रमाणे आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांवरून चर्चेत देखील राहिल्या. अशीच चर्चा सध्या बेळगाव शहरातील बहुजनांची संस्था म्हणून सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बँकेबाबत चर्चिली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली आणि बहुजनांची को-ऑप. बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकेत “नोकर भरती” …

Read More »

शनिवारी मराठा समाज, मराठी संघटनांची बैठक

  बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न व आरक्षण मिळवण्यासाठी आणि मराठा समाजाच्या एकत्र करण्यासाठी आगामी मंगळवार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या बेळगाव येथील जाहीर सभेसाठी नियोजनाची बैठक शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील श्री जत्तीमठ देवस्थान येथे …

Read More »

समितीला भरघोस मतदान करून अस्तित्व टिकवा; युवा समितीच्यावतीने आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे श्री. अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. महादेव पाटील (बेळगाव) व श्री. निरंजन सरदेसाई (कारवार) यांच्या प्रचारार्थ सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व समितीला भरघोस मतदान करून आपलं अस्तित्व …

Read More »

विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड

  तेलंगणा : तेलंगणातल्या मंचेरियल जिल्ह्यातील एका मिशनरी शाळेवर हल्ला झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या धार्मिक पोशाखावर आक्षेप घेतल्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या त्यानंतर संतप्त जमावाने शाळेवर हल्ला केला आहे. जमावाने शाळेत तोडफोड केली, तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांना जबर मारहाणही केली. संतप्त जमाव शाळेत घुसून …

Read More »

अत्यंत साध्या पद्धतीने प्रियंका जारकीहोळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  चिक्कोडी : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी आज चिक्कोडी येथील एसी कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. वडिल मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रियंका जारकीहोळी यांनी कोणताही गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज सादर केला. प्रियंका यांच्यासमवेत …

Read More »

काँग्रेसला मताधिक्य मिळेल!

  केपीसीसी प्रवक्ते मुनीर : बुथ प्रतिनिधींना प्रशिक्षण निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघात २४८ बुथ आहेत. प्रत्येक बुथवर काँग्रेसला मताधिक्य मिळेल, यासाठी बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करावे. पक्षांव्यतिरिक्त जे सामान्य मतदार आहेत, त्या मतदारांपर्यंत काँग्रेस सरकारच्या योजना आणि भाजप सरकारचे अपयश याबाबत जागृती करावी, अशा सूचना कर्नाटक प्रदेश …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक

  कोलकाता : रामनवमीनिमित्त देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. परंतु, या जल्लोषाला पश्चिम बंगालमध्ये गालबोट लागले आहे. रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील शक्तीपूर परिसरात हा हिंसाचार घडला. यामुळे या भागात १४४ कलमान्वये संचारबंदी लागू करण्यात आली. या घटनेचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यानुसार, मिरवणुकीत …

Read More »

उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

  बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास दि. 10 एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी मुला-मुलींना दररोज नारी शक्तींच्या केळी, दुध व अंडी देण्यात …

Read More »

वाढत्या उष्म्यामुळे वकीलांना कोट न घालता कामकाज करता येणार

  बेळगाव: सर्वत्र उन्हाळा चालू आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकांना उष्माघाताच्या आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे. बेळगावात देखील जवळपास तापमान 40° पर्यंत जाऊन पोहोचले आहे. अशा स्थितीत वकीलाने काळा कोट परिधान करून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणं त्रासदायक होत होते. त्या अनुषंगाने राज्य वकील संघटनेने वकीलांना होणारा त्रास ओळखून उच्च न्यायालयाकडे …

Read More »

दिल्लीचा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, घरच्या मैदानावर गुजरातचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा

  अहमदाबाद : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३२वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर ६ विकेट्सनी एकहाती विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला उतरलेला गुजरातचा संघ दिल्लीच्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना हतबल दिसला. ज्यामुळे गुजरात …

Read More »