बेळगाव : समादेवी बेळगाव येथील वैश्यवाणी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वैश्यवाणी महिला मंडळाच्या संस्थापिका सौ. सुमती कुदळे, विद्याताई मुरकुंबी, संध्याताई कपिलेश्वरी, कमल बापशेट, सुप्रिया बैलूर, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अंजली किनारी, सेक्रेटरी सौ. वैशाली पालकर, सौ. वर्षा सटवानी, सौ. सुनिता …
Read More »बेळगाव येथील युवक किटवाड तलावात बुडाला
कोवाड : किटवाड (ता. चंदगड) येथील पाझर तलावात बेळगांव येथील एक युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. याबाबत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किटवाड धरणावर बेळगाव येथील तेरा मुले फिरण्यासाठी आली होती. दरम्यान, तलावाच्या पाण्यात …
Read More »लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर! महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश
नवी दिल्ली : भाजपने बुधवारी (दि.13) लोकसभा निवडणुकीसाठी 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी भाजपने गेल्या आठवड्यात 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. पण दुस-या यादीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक शुक्रवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात म. ए. समितीच्या वतीने विचार विनिमय करून पुढील वाटचाल निर्धारित करायची आहे. तसेच कर्नाटक सरकारने दुकाने व आस्थापनांच्या …
Read More »चिक्कोडीतून अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी
बेळगाव : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार अखेर जाहीर झाला असून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीतही बेळगाव आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर न झाल्याने या दोन्ही मतदारसंघात आतापर्यंत गोंधळ सुरू आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी अनेक इच्छुक असून बेळगाव भाजपचे तिकीट कोणाला …
Read More »सुवर्ण सौध येथे सीमा आयोग कार्यालयाची स्थापना
बेळगाव : जनता आणि कन्नड समर्थक संघटनांच्या मागणीनुसार सुवर्ण विधानसौधा येथे सीमा आयोगाचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे, कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी सांगितले. आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले …
Read More »देगांव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा व म्हैस ठार
खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याच्या खुशीत वसलेल्या देगांव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा व म्हैस ठार झाली असल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, देगांव येथील शेतकरी पुंडलिक गावडा यांच्या, म्हैस व रेड्यावर वाघाने हल्ला केल्याने रेडा जागीच ठार झाला. तर या हल्यात जखमी झालेली म्हैस थोड्या …
Read More »बेळगावात हुक्का बारवर पोलिसांचे छापे; 2,56,600 रुपयांचा माल जप्त
बेळगाव : राज्यात हुक्का बारवर बंदी असतानाही शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधपणे चालवण्यात येत असलेल्या हुक्का बारवर बेळगाव पोलिसांनी छापे टाकून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे 2,56,600 रुपयांचे हुक्का व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. केंद्र सरकारने बंदी घातलेल्या हुक्का आणि तंबाखूजन्य पदार्थांचे घटक कुठून तरी …
Read More »समितीला संधीसाधूंची नाही तर गरज निष्ठावंत नेतृत्वाची….
(४) गेल्या काही वर्षात सीमाभागात राष्ट्रीय पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे समितीकडे संधी म्हणून पाहणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली आणि सोबत समितीत संधी मिळत नाही म्हणून राष्ट्रीय पक्षांचे जोडे उचलणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली. गट तट, आर्थिक आरोप अशी वरवरची कारणे सांगून समितीवर चिखलफेक करून स्वार्थासाठी आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राष्ट्रीय पक्षांचे …
Read More »गॅरंटी योजनेमुळे काँग्रेसने इतिहास रचला
पालकमंत्री सतीश जारकिहोळी; निपाणीत मेळावा निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सरकारने गॅरंटीच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पहिल्याच बैठकीत आश्वासनांची पूर्तता केली आहे. त्यामुळे महिलासह कुटुंबाचे सबलीकरण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन पालकमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta